Mercedes Car : हायब्रिड इंजिनसह Mercedes AMG S63 सादर; 'या' लक्झरी कारशी स्पर्धा करणार
Mercedes Benz Car : या नवीन मॉडेलमध्ये 4.0-L twin-turbo V8 इंजिन आहे, जे 603hp पॉवर, 900NM पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
Mercedes Benz Car : जर्मन ऑटोमोबाईल कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes Benz) जागतिक बाजारपेठेसाठी नवीन लक्झरी मर्सिडीज-एएमजी एस63 ई परफॉर्मन्स सेडान कार सादर केली आहे. कारला दमदार लूक आणि लेटेस्ट फीचर्स देण्यासाठी कंपनीने 4 सीटर केबिन दिले आहे. त्याच वेळी, कारमध्ये प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह जोडलेले ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 791hp ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारचा टॉप स्पीड 290 kmph आहे.
मर्सिडीज-एएमजी एस63 डिझाईन
नवीन मर्सिडीज-AMG S63 ला स्लोपिंग रूफलाइन, क्रोम फिनिश ग्रिल, विस्तीर्ण एअर व्हेंट्स आणि काळ्या बी-पिलरसह स्वीप्ट बॅक हेडलाइट्स, आउट साइड रीअर व्ह्यू मिरर (ORVM) आणि डिझायनर मल्टी-स्पोक 21-इंच अलॉय व्हील्ससह नवीन हुड मिळतो. देखील दिले आहेत. या कारच्या मागील बाजूस ट्विन एक्झॉस्ट टिप्स आणि रॅप-अराउंड एलईडी टेल लॅम्प वापरण्यात आले आहेत. या कारची परिमाणे 5044 मिमी लांब, 1446 मिमी उंच आणि 1913 मिमी रुंद असून तिचा व्हीलबेस 2945 मिमी आहे.
मर्सिडीज-AMG S63 इंजिन
या नवीन मॉडेलमध्ये, 4.0-L ट्विन-टर्बो V8 इंजिन, जे 603hp पॉवर, 900NM चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याच वेळी, यामध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर 188hp ची कमाल पॉवर आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास देखील सक्षम आहे. जे 13.1kWh बॅटरीसह जोडलेले आहे. हा सेटअप कारला 791hp पॉवर आणि 1430Nm टॉर्क जनरेशन देतो. या कारचे ट्रान्समिशन 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार केवळ 3.2 सेकंदात 0-96 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे आणि तिचा टॉप स्पीड 290 किमी प्रतितास आहे.
मर्सिडीज-AMG S63 वैशिष्ट्ये
या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या लक्झरी कारमध्ये सनरूफसह प्रीमियम सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पॉवर फ्रंट सीट्स, नवीन सेंटर कन्सोल आणि टच-सेन्सिटिव्ह स्विचेस आणि 3-स्पोक मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील आहेत. याशिवाय 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट रीडरसह 11.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील या कारमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये अनेक एअरबॅगही देण्यात आल्या आहेत.
मर्सिडीज-AMG S63 किंमत किती?
या कारच्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या कारची साधारण किंमत 1.4 कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे.
कोणाशी स्पर्धा करणार?
मर्सिडीज-एएमजी एस 63 कार भारतातील पोर्श पानामेरा टर्बो आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटीशी स्पर्धा करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :