Mclaren ने भारतात लॉन्च केली सर्वात महागडी कार, इतकीया किंमतीत खरेदी करता येईल अनेक फॉर्च्युनर
Mclaren 765LT Spider Launch: जगभरातील वाहन उत्पादक कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. आपल्या देशात सार्वधिक महाग ते सर्वात स्वस्त असे सर्व प्रकारचे वाहन उपलब्ध आहेत.
Mclaren 765LT Spider Launch: जगभरातील वाहन उत्पादक कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. आपल्या देशात सार्वधिक महाग ते सर्वात स्वस्त असे सर्व प्रकारचे वाहन उपलब्ध आहेत. हे सर्व वाहन वेगवेगळी डिझाइन आणि फीचर्ससह येतात. जगभरातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या भारतात आपल्या कार आणि बाईक लॉन्च करत असतात. यात अनेक वाहन हे फक्त आपल्या किंमतीमुळे चर्चेत असतात. अशीच एक कार भारतात लॉन्च झाली आहे. जिची किंमत वाचून तुम्ही धक्का व्हाल. चला तर जाणून घेऊ या कारबद्दल.
ब्रिटीश मोटार रेसिंग कार उत्पादक मॅक्लारेनने (Mclaren) भारतात सर्वात महागडी कार लॉन्च केली आहे. या महागड्या कारचे नाव Mclaren 765LT Spider आहे. जी भारतीय बाजारपेठेत सुपरकार म्हणून ओळखली जाते. मॅक्लेरेनच्या 765LT स्पायडर सुपरकारचे छप्पर फक्त 11 सेकंदात फोल्ड होते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवरसाठी यात 4.0 लीटर ट्विन टर्बो चार्ज V8 पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 765 Ps आणि 800 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 7-स्पीड अनुक्रमिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कारला साइड स्कर्ट, अग्रेसिव्ह फ्रंट बंपर, रॅपराऊंड रिअर बंपर आणि स्प्लिटर मिळतील.
किती आहे किंमत?
McLaren 765 LT Spider सुपरकार अनेक प्रकारे खास आहे. मॅक्लारेनने आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्वात फास्ट Convertible पैकी एक आहे. Mclaren 765LT Spider नावाच्या कारची संभाव्य किंमत 12 कोटी रुपये आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. ही कार बनवण्यासाठी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. या सुपरकारच्या परफॉर्मन्स बोलायचे झाले तर, ही कार फक्त 2.8 सेकंदात 0-100KM/HR वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड 330 किलोमीटर प्रति तास आहे. कार पूर्ण टायटॅनियम एक्झॉस्ट सिस्टमच्या एरोडायनॅमिकली डिझाइन केलेली आहे. दरम्यन, कंपनीने मुंबईत आपले पहिले सर्व्हिस सेंटर उघडले आहे. जर या कारची किंमत 12 कोटी रुपये असेल, तर या रकमेमध्ये तुम्ही टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप व्हेरिएंटच्या सुमारे 12 कार खरेदी करू शकाल.
इतर ऑटो संबंधित बातम्या: