Electric Vehicle : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे. या शर्यतीत आता आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही (Maruti Suzuki)  उडी घेतली आहे. मारुती लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) भारतात लॉन्च करणार आहे. एका रिपोर्टनुसार, या कारवर मारुती सुझुकी आणि टोयोटा (Toyota)मिळून काम करत आहे. 


टाटा नेक्सन, ह्युंदाई इलेक्ट्रिक कारला देणार टक्कर 


मारुती सुझुकी आणि टोयोटा मिळून काम करत असलेली ही एसयूव्ही 2025 मध्ये भारतात लॉन्च केली जाऊ शकते. सध्या गुजरातमधील मारुती सुझुकीच्या वाहन कारखान्यात यावर काम सुरू आहे. भारतात मारुतीच्या या अपकमिंग कारची स्पर्धा टाटा नेक्सन (Tata Nexon), एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) आणि ह्युंदाई कोना (Hyundai Kona) इलेक्ट्रिक एसयूव्हीशी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सर्वात आधी इलेक्ट्रिक कारच्या एसयूव्ही प्रकारात पदार्पण करणार आहे. यानंतर भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या मारुती वॅगनआरचा देखील इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी आणू शकते. 


'हे' असेल मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव


ऑटोकार इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मारुती आणि टोयोटाच्या या आगामी इलेक्ट्रिक कारचे नाव Maruti Suzuki YY8 असे असू शकते. कंपनी यात 48kWh किंवा 59kWh चा बॅटरी पॅक देऊ शकते. या कारची साईझ Hyundai Creta इतकीच असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास या कारचा आकार टाटा नेक्सनपेक्षाही मोठा ठरू शकतो.


किंमत किती? 


कंपनीने आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत 13 ते 15 लाख रुपयांदरम्यान ठेवू शकते. ही किंमत भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार 'टाटा नेक्सन'पेक्षा कमी आहे. भारतीय बाजारात टाटा नेक्सनची प्रारंभिक किंमत 14.29 लाखांपासून सुरू होऊन 16.90 लाख रुपयांपर्यंत आहे.


एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीचा पल्ला 


YY8 एसयूव्ही पीएल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. याचा 2 डब्लूडी व्हेरिएंट सर्वात स्वस्त ठरणार असून यात कंपनी 48 किलोवॅट-आर बॅटरी पॅक देणार आहे. जी एकदा चार्ज केल्यास कार 400 किमीपर्यंत धावू शकते.  तसेच याच्या 2 डब्लूडी व्हेरिएंटमध्ये कंपनी 59 किलोवॅट-आर बॅटरी पॅक देणार आहे. जे दोन इलेक्ट्रिक मोटरसह येणार आहे. या व्हेरिएंटची बॅटरी एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 500 किमीपर्यंत धावू शकते, असे सांगण्यात येत आहे.   


संबंधीत बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI