Jeep Meridian SUV : जीप इंडियाने पुष्टी केली आहे की, त्यांचे पुढील उत्पादन ‘जीप मेरिडियन’ लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. ‘मेरिडियन’ ही त्याची 7-सीटर SUV कार असणार आहे. जीपने देखील पुष्टी केली आहे की, ‘जीप मेरिडीयन’च्या मध्यात लाँच केली जाईल. अर्थात या लाँचिंगला काही महिने बाकी आहे.
परंतु, मेरिडियन लांब आणि मोठी असेल. कारण, ती तीन लाईन सीटर असणार आहे. मेरिडियन हे 7-सीटरमध्ये कंपासपेक्षा मोठे व्हीलबेस/मोठे दरवाजे असतील.
गाडीच्या छायाचित्रात डिझाईन स्पष्ट दिसून येत नाही. परंतु, गाडीची लांबी, समोरील बंपर डिझाईन आणि मजबूत कॅरेक्टर लाईन दिसत आहे. ग्रिल डिझाईनचा समावेश असलेल्या जीपमध्ये नव्या डिझाईनचे हेडलॅम्प आणि एका वेगळ्या लुकची अपेक्षा आहे. मेरिडियन हे अधिक प्रीमियम उत्पादन असल्याने या गाडीमध्ये, कंपास फेसलिफ्टप्रमाणे, 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर सीट, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि अधिक वैशिष्ट्यांसह लाँचिंगची अपेक्षा आहे.
जीपने इतर कोणत्याही अधिक तपशिलांची पुष्टी केलेली नाही. परंतु, मानक 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 2.0-लिटर डिझेलच्या अधिक शक्तिशाली व्हर्जनच्या लाँचची अपेक्षा आहे. तर, 4x4 देखील मानक असेल, कारण ती जीप ब्रँडच्या मध्यवर्ती आहे. लाँचच्या वेळी गाडीचे आणखी फीचर्स समोर येतील. परंतु, सध्या अशी अपेक्षा आहे की ही, नवीन 7-सीटर SUV प्रीमियम 7-सीटर SUV स्पेसमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर ते स्कोडा कोडियाकला नक्की टक्कर देईल.
हेही वाचा :
- EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार?
- Mahindra Electric SUV : महिंद्रा घेऊन येणार तीन नवीन इलेक्ट्रिक SUV, यावर्षी जुलैमध्ये होणार लॉंच
- Tata Nano Car : टाटांची नॅनो कार 'या' रुपात पुन्हा रस्त्यावर धावणार? रतन टाटांच्या फोटोमुळे चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI