Electric Road for Electric Vehicles : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत चालला आहे. पण इलेक्ट्रिक वाहनं इच्छा असूनही अनेकजण घेण्याचं टाळतात. याचं मुख्य कारण आहे इलेक्ट्रिक वाहनं चार्जिंगची अपुरी व्यवस्था. मात्र आता यावर एक जबरदस्त तोडगा निघणार आहे. यावर अमेरिका काम करत आहे. अमेरिकेत आता इलेक्ट्रिक वाहने चालत असताना रस्त्यावर चार्ज होण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यूएसएमधील डेट्रॉईटमध्ये वाहन चार्जिंग पायलट प्रोग्रामचा एक भाग म्हणून असा 'इलेक्ट्रिक रोड' तयार केला जाणार आहे.
हा प्रयोग जर अमेरिकेत यशस्वी झाला तर भारतात देखील असा प्रयोग होऊ शकतो का? यावर चर्चा सुरु आहे. भारतामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे मध्येही अशी यंत्रणा कार्यान्वित करता येऊ शकते. त्याच्यासह देशातील सहा एक्स्प्रेस वे मध्येही यंत्रणा राबवता येऊ शकते का? याचा विचार करणे गरजेचे आहे.
मिशिगन डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन (MDOT) ने युनायटेड स्टेट्समधील पहिली सार्वजनिक वायरलेस इन-रोड चार्जिंग सिस्टम तयार करण्यासाठी Electreon द इलेक्ट्रिक रोड सिस्टम (ERS) कंत्राट दिले आहे. या ऐतिहासिक कराराची घोषणा करताना मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर म्हणाले की, विद्युत वाहनांचे उत्पादन वाढवून आणि ग्राहकांच्या खर्चात घट करून गतिशीलता आणि विद्युतीकरणाचे भविष्य घडवण्याचे आमचे ध्येय असल्याने वायरलेस इन-रोड चार्जिंग सिस्टम केली जाणार आहे.
व्हिटमर म्हणाले की, हा प्रयोग पाहून खरोखर आनंद होत आहे. यामुळं नवीन व्यवसाय संधी आणि उच्च तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. अशा अभूतपूर्व उपक्रमांना पुढे चालू ठेवायला हवं.
गव्हर्नर व्हिटमर यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मोटर बेला येथे प्रथम इंडक्टिव्ह व्हेईकल चार्जिंग पायलटची घोषणा केली होती. MDOTकडून सुरक्षित प्रणाली, स्केलेबल, उद्योग तंत्रज्ञान आणि वाहने यांच्याशी आंतरक्रिया करण्यायोग्य आणि आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा प्रकल्पाची घोषणा केली होती.
या प्रकल्पासाठी Electreon नेक्स्टएनर्जी आणि जेकब्स इंजिनीअरिंग ग्रुपसोबत काम केलं जाणार आहे. हा प्रकल्प सध्या डेट्रॉईटमध्ये डायनॅमिक आणि स्थिर अशा दोन्ही प्रकारच्या वायरलेस EV चार्जिंगच्या एक मैलापर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प मिशिगन सेंट्रल, मोबिलिटी इनोव्हेशन डिस्ट्रिक्टद्वारे केला जात आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI