Kia Carens : किया कार कंपनीची नवी कारेन्स उद्या लॉन्च होत आहे. किया कारेन्स (Kia Carnes) ही एक सात सीटर एसयुव्ही आहे. आतापर्यंत किया कंपनींच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता किया कारेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा कंपनी व्यक्त करत आहे. कियाची ही कारेन्स दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल पॉवरट्रेनसह 6-7 सीटर ले-आउटमध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस फिचर्ससह ही कार बाजारात येत आहे.
कारेन्सच्या वैशिष्ट्यांमध्ये 66 कनेक्टेड कारसह 26.03 cm (10.25") HD टचस्क्रीन नेव्हिगेशन, 8-स्पीकर बोस ऑडीओ सिस्टीम, व्हायरस आणि बॅक्टेरिया संरक्षणासह स्मार्ट शुद्ध हवा प्युरिफायर आणि हवेशीर फ्रंट सीटचा समावेश आहे. तर रो सीट्समध्ये "वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल" आणि सनरूफचा समावेश आहे. लूकचा विचार केला तर कॅरेन्सचा पुढील भाग खूपच आकर्षक आहे. त्यामध्ये हेडलॅम्प आणि डीआरएल वेगळे केले आहेत.
कारेन्सचे डिझाइन खूपच आकर्षक आहे. त्यामध्ये ड्युअल टोन अपहोल्स्ट्री, उच्च गुणवत्तेच्या बिट्सचा समावेश आहे. तर पुढील भागात बेसिक डॅशबोर्डची स्क्रीन 10.25-इंच आहे. केरेन्सचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील डिजिटल आहे. याबरोबरच टच इलेक्ट्रिक फोल्डिंग सीट यंत्रणा हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या फिचर्समुळे केवळ एक बटण दाबाल्यानंतर सीट दुमडल्या जातील. त्यामुळे अगदी सहज पद्धतीने कारच्या आत-बाहेर जाता येणार आहे. शिवाय कारच्या आतील जागाही खूप आहे. चालकाच्या मागील सीटसाठी एअर प्युरिफायरने उंची थोडी कमी केली तर मधील सीटवरही चांगली जागा मिळते.
कियाच्या या कारमध्ये स्मार्टस्ट्रीम 1.5 लिटर पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 लिटर टी-जीडीआय पेट्रोल आणि 1.5 लिटर सीआरडीआई वीजीटी डिझेल पर्यायासह 6MT, 7DCT आणि 6AT तीन ट्रान्समिशचा समावेश आहे. टर्बो पेट्रोलला DCT पर्याय मिळेल तर डिझेलमध्ये टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ऑफर असेल. केरेन्स टोयोटा इनोवा, क्रिस्टा आणि ह्युंदाईच्या अल्काजरला टक्कर देत आहे.
महत्वाच्या बातम्या
- EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार?
- Mahindra Electric SUV : महिंद्रा घेऊन येणार तीन नवीन इलेक्ट्रिक SUV, यावर्षी जुलैमध्ये होणार लॉंच
- Tata Nano Car : टाटांची नॅनो कार 'या' रुपात पुन्हा रस्त्यावर धावणार? रतन टाटांच्या फोटोमुळे चर्चा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI