(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti Discount Offers : आनंदवार्ता! मारूती सुझुकी नेक्सा मॉडेल्सवर देतेय भरघोस ऑफर; ड्रीम कार खरेदी करण्याची संधी
Discount on Maruti Cars : जर तुम्ही देखील मारुती सुझुकी नेक्सा रेंजची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते, खरं तर कंपनी या महिन्यात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे
Discount on Maruti Cars : जर तुम्ही देखील नवीन कार विकत घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स घेऊन येतेय. या कारचे काही पॉप्युलर मॉडेल जसे की, फ्रॉक्स, ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि जिम्नी (Jimny) सारख्या प्रीमियम नेक्सा रेंजवर मोठ्या प्रमाणात सूट मिळतेय. खरंतर, मारूती सुझुकी कार आपल्या अग्रेसिव्ह किंमतींसाठी आणि लूकसाठी ओळखली जाते. कंपनीने मारूती सुझुकीच्या काही मॉडेल्सवर 4,000 ते 1.5 लाखांपर्यंत सूट जाहीर केली आहे. इग्निसबद्दल बोलायचे झाले तर, या हाय-रायडिंग हॅचच्या मॅन्युअल आणि एएमटी व्हेरिएंटवर 79,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. मारूतीच्या आणखी कोणत्या कारवर किती सूट मिळतेय ते पाहूयात.
बलेनो डिस्काऊंट ऑफर
मारुती बलेनो पेट्रोल-मॅन्युअल, ऑटोमॅटिक किंवा सीएनजी-मॅन्युअल पर्यायांसह येते. बलेनोच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर CNG ट्रिमवर 33,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. बलेनो इग्निस प्रमाणेच 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 90hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते.
Ciaz, Grand Vitara आणि XL6 वर ऑफर
मारुती आपल्या Ciaz आणि XL6 वर अनुक्रमे 53,000 आणि Rs 20,000 पर्यंत प्रचंड सूट देत आहे. ग्रँड विटारा सीएनजीवर एकूण 4,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे, तर इतर व्हेरिएंटवर 59,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या महिन्यात, ग्रँड विटारा हायब्रिडवर 79,000 रुपयांपर्यंतचा लाभ उपलब्ध आहे.
फ्रोक्स आणि जिम्नी कारवर डिस्काऊंट
कंपनी 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह Frontex मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, तर 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 55,000 रुपयांचा फायदा मिळत आहे. जिमनीला मार्चमध्ये सर्वाधिक सवलत मिळत आहे, ज्यामध्ये एकूण 1.5 लाख रुपयांच्या लाभांचा समावेश आहे. तसेच, ही सवलत फक्त मुंबई आणि रत्नागिरी येथील डीलरशिपसाठी लागू आहे. गोव्यातील जिमनीचे ग्राहक 50,000 रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही देखील नवीन कार विकात घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. तुमची ड्रीम कार विकत घेण्याची ही चांगली संधी आहे. तसेच, तुम्ही या महिन्यापर्यंत मारूती सुझुकीच्या या कारवर बुकिंग सुरु करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :