Upcoming Mahindra SUV: Mahindra XUV 500 पुन्हा बाजारात उतरणार? टीझर रिलीज
Upcoming Mahindra SUV: एसयूव्ही कारसाठी प्रसिद्ध असलेली वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आपल्या XUV 300 आणि XUV 700 मधील रिकामी स्पेस भरण्याच्या तयारीत आहे.
Upcoming Mahindra SUV: एसयूव्ही कारसाठी प्रसिद्ध असलेली वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आपल्या XUV 300 आणि XUV 700 मधील रिकामी स्पेस भरण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे चीफ डिझाइन ऑफिसर प्रताप बोस यांनी नवीन महिंद्रा एसयूव्हीचा टीझर जारी करून हे संकेत दिले आहेत. ज्यानंतर XUV 500 पुन्हा बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीझरमध्ये दिसणारी एसयूव्ही पूर्णपणे झाकलेली आहे. परंतु सुरुवातीला छतावरील रेल, एक नवीन मोठा फ्रंट बंपर, मोठे व्हील्स आर्क आणि अपराईट विंडशील्डसह सॉल्ड शोल्डर लाइट्स दिसत आहे. ही डिझाइन पाहता याला मोठी बूट स्पेस मिळण्याची अपेक्षा आहे. ही कार कधी लॉन्च होऊ शकते, कंपनी आपल्या या आगामी कारमध्ये कोणते नवीन फीचर्स देऊ शकते? तसेच ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यावर याची किंमत किती असू शकते? याशिवाय भारतात याची स्पर्धा कोणत्या कारशी होऊ शकते, हे जाणून घेऊ...
Mahindra XUV 500 पुन्हा बाजारात होणार लॉन्च? टीझर रिलीज
कंपनीने आपले सर्वात लोकप्रिय मॉडेल XUV 500 तात्पुरते बंद केले होते. मात्र आता व्यक्त केली जात असलेली शक्यता जर खरी ठरली तर, या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. तसेच यात 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळणे अपेक्षित आहे.
Upcoming Mahindra SUV: मिळू शकतात हे फीचर्स
लेव्हल 2 ADAS सिस्टम, 7 एअरबॅग्ज, इलेक्ट्रिकली कंट्रोल्ड सनरूफ, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, यासह इतर अनेक फीचर्स या नवीन SUV मध्ये दिले जाऊ शकतात.
Upcoming Mahindra SUV: कोणाशी होणार स्पर्धा?
महिंद्राची ही आगामी SUV भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सोबत स्पर्धा करू शकते, तसेच नवीन Kia Seltos सुद्धा या SUV ला टक्कर देऊ शकते.
Upcoming Mahindra SUV: कधी होणार लॉन्च?
सध्या कंपनीने या टीझरशिवाय कोणतीही माहिती दिलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही SUV पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सादर होण्याची शक्यता आहे. याची प्रारंभिक किंमत 8 ते 12 लाख रुपये असू शकते.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: