Tata Curvv EV : टाटा मोटर्सने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारची संकल्पना लाँच केली आहे. टाटा कंपनीची ही पहिली कार असेल ज्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंट नसणार आहे. टाटा मोटर्सने या कारला टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक SUV (Tata Curvv EV) असं नाव दिलं आहे. टाटाची नवी Curvv EV सुरुवातीला पूर्णत: EV कार म्हणून लाँच केली जाईल. त्यानंतर या कारचं पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायांमध्ये लाँच केलं जाईल.
Tata Curvv EVचे अधिक फोटो येथे पाहा
भारतात कधी होणार लाँच?
Curvv EV ही टाटा मोटर्सच्या EV पोर्टफोलिओमधील पहिली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक SUV असेल. ही कार भारतात 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. Curvv EV टाटा मोटर्सच्या मॉड्यूलर ALFA वर आधारित असण्याची शक्यता आहे. टाटाने कर्व्हची पॉवरट्रेनबाबत माहिती उघड केलेली नाही, परंतु ही कार दुसऱ्या पिढीतील ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित असण्याची शक्यता आहे.
कोणते फीचर्स मिळण्याची शक्यता?
Curvv EV ला मागच्या आणि पुढच्या बाजूला LED असतील. एसयूव्ही बॉडी शेपमध्ये असणाऱ्या कारमध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि कूप सारखी रूफलाइन असण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सच्या संकल्पनेच्या Curvv EV च्या कारच्या केबिनमध्ये ट्विन ऑल-डिजिटल डिस्प्ले स्क्रीन, फॅब्रिक-फिनिश डॅशबोर्ड, पॅनोरामिक सनरूफ, प्रकाशित लोगो असणार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर म्हणजेच सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत अंतर गाठू शकते.
अत्याधुनिक इंटीरियर
या SUV मध्ये अत्याधुनिक इंटीरियर असले. केबिनमध्ये एक मोठी टचस्क्रीन असण्याची शक्यता आहे, जी डॅशबोर्डच्यावर स्लॉट केलेली असेल. त्याच्या पुढे एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल, जो पारंपरिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरपेक्षा वेगळा आहे. त्याचबरोबर या कारमध्ये अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमॅटिक एसीसह टचस्क्रीन कंट्रोल यांसारख्या फिचरसाठीही टचस्क्रीनचा वापर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ही आहे जगातील पहिली 'सोलर इलेक्ट्रिक कार', एका चार्जमध्ये गाठते 805 किमी
- EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दोन दिग्गज समूह एकत्र; रिलायन्स Jio bp आणि टीव्हीएस मोटर कंपनीची भागीदारी
- Tesla : टेस्ला विक्रीला मागे टाकण्यासाठी GM आणि Honda ची नवी रणनीती, जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI