EV Charging : वाढते इंधन दर आणि प्रदूषण त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी सरकारसह विविध वाहन कंपन्या मेहनत घेत आहेत. अशात या वाहनांच्या चार्जिंगची समस्या मात्र असल्याने आता EV अर्थात इलेक्ट्रिक व्हीआय़कल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दोन दिग्गज समूह एकत्र येत आहेत. रिलायन्स Jio-bp आणि TVS मोटर कंपनी देशातील इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी एकत्र येणार आहेत.  


या प्रस्तावित भागीदारी अंतर्गत, TVS इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांना Jio-bp च्या व्यापक चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळणे अपेक्षित आहे, जी इतर वाहनांसाठी देखील खुली असतील असं या दोन्ही कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी नियमित एसी चार्जिंग नेटवर्क आणि डीसी फास्ट-चार्जिंग नेटवर्क तयार करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त, कंपन्या "सर्वोत्कृष्ट ग्लोबल विद्युतीकरणातील शिक्षणास सक्षम करतील आणि ग्राहकांना आनंद देणारा एक वेगळा अनुभव भारतीय बाजारपेठेत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."


Jio-bp ब्रँड Jio-bp पल्स अंतर्गत त्यांची EV चार्जिंग आणि स्वॅपिंग स्टेशन्स चालवत आहे. Jio-bp पल्स अॅपसह, ग्राहक सहजपणे जवळपासची स्टेशन शोधू शकतात आणि त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकतात. भारतातील सर्वात मोठ्या EV नेटवर्क होण्याच्या दृष्टीकोनातून, Jio-bp एक चार्जिंग इकोसिस्टम तयार करते आहे ज्याचा ईव्ही मूल्य शृंखलातील सर्व भागधारकांना फायदा होईल. दुसरीकडे, TVS मोटर कंपनीने आपल्या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube च्या 12,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली. TVS iQube ही एक स्मार्ट, कनेक्टेड आणि व्यावहारिक ईव्ही आहे जी ग्राहकांची रोजची प्रवासाची गरज पूर्ण करते. कंपनीने या व्यवसायासाठी 1,000 कोटी रुपये आधीच गुंतवले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिवाय, TVS मोटर कंपनी 5-25kW च्या श्रेणीतील दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलिओ देखील तयार करते आहे, जे पुढील 24 महिन्यांत बाजारात येतील. "या चार्जिंग स्टेशन्सचा वेगवान प्रसार दोन्ही कंपन्यांची क्षितिजे विस्तृत करतील आणि भारताच्या निव्वळ-शून्य उत्सर्जन उद्दिष्टांना गती देतील" असा विश्वास या दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केला आहे. ही भागीदारी देशातील दुचाकी आणि तीन-चाकी ग्राहकांमध्ये ईव्हीचा अवलंब करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





Car loan Information:

Calculate Car Loan EMI