Tata Curvv EV : टाटाची नवी Curvv EV, सिंगल चार्जमध्ये गाठणार 500 किमी अंतर, भारतात केव्हा होणार लाँच?
टाटा मोटर्सने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारची संकल्पना लाँच केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा कंपनीची ही पहिली कार असेल ज्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंट नसणार आहे.
टाटा मोटर्सने या कारला टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक SUV (Tata Curvv EV) असं नाव दिलं आहे.
टाटाची नवी Curvv EV सुरुवातीला पूर्णत: EV कार म्हणून लाँच केली जाईल. त्यानंतर या कारचं पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायांमध्ये लाँच केलं जाईल.
Curvv EV ही टाटा मोटर्सच्या EV पोर्टफोलिओमधील पहिली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक SUV असेल.
ही कार भारतात 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Curvv EV टाटा मोटर्सच्या मॉड्यूलर ALFA वर आधारित असण्याची शक्यता आहे.
टाटाने कर्व्हची पॉवरट्रेनबाबत माहिती उघड केलेली नाही, परंतु ही कार दुसऱ्या पिढीतील ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित असण्याची शक्यता आहे.