Solar Car: लवकरच कार बाजारात अशा एका कारची एंट्री होणार आहे, जी सौरऊर्जेवर (Solar Car) धावते. या कारचे नाव आहे Humble One. कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनी हम्बल मोटर्सने सौरऊर्जेवर धावणारी कार लॉन्च केली आहे. या एसयूव्हीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. Humble One कारची बॅटरी सूर्यप्रकाश सोबतच विजेने देखील चार्ज होऊ शकते. हे पॉवर सॉकेट, स्टँडर्ड ईव्ही चार्जिंग पॉइंट आणि ईव्ही फास्ट चार्जमधून देखील चार्ज केले जाऊ शकते.


किंमत किती?


या कारची (Trending Cars) किंमत 1,09,000 डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक SUV 300 डॉलर्समध्ये म्हणजे जवळपास 22,000 रुपयांमध्ये बुक करू शकता. गेल्या दोन वर्षांपासून या गाडीचे काम सुरू होते. कंपनीचे म्हणणे आहे की, त्याचे हे उत्पादन 2024 मध्ये बाजारात येईल आणि 2025 मध्ये याची डिलिव्हरी सुरू होईल.


इलेक्ट्रिक कारच्या बाजारात या कारकडे एक मोठा शोध म्हणून पाहिलं जात आहे. हंबल वन कार ही पाच सीटर एसयूव्ही आहे. कारच्या छतावर फोटोव्होल्टेईक पेशींनी बनवलेले 82.35 चौरस फुटांचे सौर पॅनेल आहे. Humble One कारची मोटर 1020hp जनरेट करते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाच्या समस्येच्या युगात या कारकडे एक आशेची किरण म्हणून पाहिलं जात आहे. Humble Motors चा दावा आहे की, Humble One इलेक्ट्रिक SUV एका चार्जमध्ये 805 किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकते. फक्त सोलर मोडमध्ये ही कार सुमारे 96 किमी धावू शकते. दरम्यान, जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारची विक्री पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे.


संबंधित बातम्या: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI