(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ola इलेक्ट्रिक स्कूटर कशी बनवली जाते? स्वतःच पाहा; कंपनीची ग्राहकांना ऑफर
Ola Future Factory: ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात प्रचंड विक्री होत आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आणि आता 50,000 हून अधिक स्कूटर विकल्या आहेत.
Ola Future Factory: ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात प्रचंड विक्री होत आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आणि आता 50,000 हून अधिक स्कूटर विकल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी 50,000 ग्राहकांना कंपनीच्या फ्युचर फॅक्टरीला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. नुकतेच भावीश यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, यापूर्वी त्यांनी Ola S1 स्कूटरच्या 1,000 ग्राहकांना कॉल करण्याची योजना आखली होती, परंतु आता त्यांनी 50,000 ग्राहकांना फ्युचर फॅक्टरीला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. Ola S1 स्कूटरचे ग्राहक 19 जून रोजी फ्युचर फॅक्टरीला भेट देऊ शकतात.
For our customer event at the Ola Futurefactory on Sunday 19th June, earlier plan was to invite 1000 customers.
— Bhavish Aggarwal (@bhash) June 11, 2022
Now we’ve decided to invite ALL our Ola S1 customers, more than 50,000! We’ll have a factory tour, customer celebrations and MoveOS 2 launch!!#EndICEAge pic.twitter.com/WSiJZnQVV9
ओलाची फ्युचर फॅक्टरी तामिळनाडूमध्ये आहे. ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन फॅक्टरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भावीश म्हणाले की, भारतीय वाहन निर्मात्याने आपल्या कारखान्याला भेट देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनी 19 जून रोजी आपली नवीन ई-स्कूट Move2OS लाँच करणार आहे.
ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. ओला स्कूटरचे अनेक ग्राहक त्याच्या आकर्षक रेंज आणि डिझाइनची प्रशंसा करत असले तरी, असे अनेक ग्राहक असे आहेत जे ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर खूश नाहीत. अनेक ग्राहकांनी Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर वेळेवर न मिळाल्याची तक्रार केली आहे. तर अशा ग्राहकांची संख्याही मोठी होती आहे, ज्यांना चांगली फिट आणि फिनिश असलेली स्कूटर दिली गेली नाही. दुसरीकडे ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.