Honda Electric Scooter: Honda आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची 29 मार्चला करू शकते घोषणा, पुढील वर्षी होऊ शकते लॉन्च
Electric Activa: दुचाकी उत्पादक Honda मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया 29 मार्च 2023 रोजी इलेक्ट्रिक दुचाकींसाठी आपली योजना जाहीर करणार आहे.
Electric Activa: दुचाकी उत्पादक Honda मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया 29 मार्च 2023 रोजी इलेक्ट्रिक दुचाकींसाठी आपली योजना जाहीर करणार आहे. यामध्ये कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती शेअर करेल. ही स्कूटर मार्च 2024 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
Electric Activa: 2025 पर्यंत 2 मॉडेल्स येतील
या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Activa चे नाव वापरले जाऊ शकते. जे लोकांमध्ये ही स्कूटर लोकप्रिय होण्यास मदत करेल, तसेच यासाठी कंपनीला मार्केटिंग आणि प्रमोशनवर जास्त खर्च करावा लागणार नाही. कंपनी 2025 पर्यंत जागतिक बाजारपेठेत आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. त्यापैकी एका इलेक्ट्रिक अॅक्टिव्हाचाही समावेश असेल.
Electric Activa: पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा येईल
भारतासाठी ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर होंडा जपानच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आतुशी ओगाटा यांनी माहिती दिली आहे की, कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्यासाठी सज्ज असेल.
Electric Activa: डिझाइन कसे असेल?
याच्या बॅटरी पॅक नवीन Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्लोरबोर्डखाली दिला जाईल. तर त्याच्या मागील चाकामध्ये हब मोटर दिली जाऊ शकते. कंपनी Honda बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कसह काढता येण्याजोग्या बॅटरीसाठी देखील काम करत आहे. पण हा सेटअप कंपनीच्या आगामी वाहनांमध्ये दिसेल. अॅक्टिव्हा ई-स्कूटरला त्याच्या ICE आवृत्तीसारखे डिझाइन आणि फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याच्या स्टाईल आणि डिझाइनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.
Ola S1 शी करेल स्पर्धा
ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ARAI प्रमाणित रेंज 141 किमी आहे. साधारणपणे रस्त्यावर ही स्कूटर 128 किमीची रेंज सहज देऊ शकते. S1 प्रो प्रमाणेच S1 चालवण्याची मजा येईल, असे ओलाचे म्हणणे आहे. Ola S1 आणि S1 Pro 8.5kW (11.3 bhp) आणि 58 Nm टॉर्कच्या कमाल पॉवर आउटपुटसह समान हायपरड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. Ola च्या दाव्यानुसार, S1 Pro चा टॉप स्पीड 95 km/h आहे. ज्यामुळे ही स्कूटर हायवेवर देखील सहज चालवता येते. ही स्कूटर केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. S1 चा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. तर S1 प्रोचा टॉप स्पीड 116 किमी प्रतितास आहे. ओलाचे म्हणणे आहे की नियमित चार्जरसह, S1 पूर्णपणे 4.5 तासांमध्ये चार्ज होऊ शकतो.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: