Honda Electric Scooters: होंडा आणणार दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, 2024 पर्यंत होणार लॉन्च; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Upcoming Electric Scooters: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने अद्याप इलेक्ट्रिक दुचाकी सेगमेंटमध्ये एंट्री केलेली नाही. मात्र कंपनी लवकरच आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरसह इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री घेऊ शकते.
Upcoming Electric Scooters: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने अद्याप इलेक्ट्रिक दुचाकी सेगमेंटमध्ये एंट्री केलेली नाही. मात्र कंपनी लवकरच आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरसह इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री घेऊ शकते. सध्या या सेगमेंटमध्ये ओला, बजाज, एथर सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर वर्चस्व गाजवत आहे. मात्र लवकरच यांना जबरदस्त टक्कर होंडा देऊ शकते. होंडा 2024 मध्ये आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
नवीन प्लॅटफॉर्मवर तयार होणार होंडा इलेक्ट्रिक स्कूटर
Honda च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जातील, ज्याला कोडनेम 'E' प्लॅटफॉर्म म्हटले जात आहे. या नवीन प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने विविध बॅटरी पॅक आणि इन्स्टॉलेशनसह अनेक इलेक्ट्रिक वाहने बनविण्यात मदत होईल. कंपनीचे पुढील वर्षी लॉन्च होणारे इलेक्ट्रिक वाहन मध्यम श्रेणीतील इलेक्ट्रिक स्कूटर असेल.
Honda Activa Electric : इलेक्ट्रिक अवतारात येऊ शकते अॅक्टिव्हा
होंडाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर परवडणारी मॉडेल असण्याची शक्यता आहे, या नवीन स्कूटरचे नाव Honda Activa Electric असू शकते. होंडाने अलीकडेच बॅटरी पॅक आणि हब मोटरसाठी पेटंटसाठी अर्ज केला आहे, ज्याचा वापर या ई-स्कूटरसाठी केला जाऊ शकतो. होंडाने माहिती दिली आहे की, त्याचे दुसरे इलेक्ट्रिक मॉडेल स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह येईल. यासोबतच कंपनी देशभरात अनेक बॅटरी स्वॅपिंग पॉइंट्सही स्थापन करणार आहे.
कंपनी चार्जिंग स्टेशन बनवणार
कंपनी देशभरात 6000 पेक्षा जास्त नेटवर्क टचपॉइंट्सवर चार्जिंग स्टेशन स्थापित करेल. त्यातील काही वर्कशॉप 'ई' मध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. यामध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी प्रकारांसाठी HEID बॅटरी एक्सचेंजर्स आणि मिनी बॅटरी एक्सचेंजर्स आणि निश्चित बॅटरी प्रकारांसाठी चार्जिंग केबल्स सारख्या सुविधा पुरवल्या जातील. यासोबतच कंपनी पेट्रोल पंप, मेट्रो स्टेशन आणि इतर ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग स्टेशनसह अनेक ईव्ही सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे, जेणेकरून त्यांच्या EV वापरकर्त्यांसाठी बॅटरी स्वॅपिंग सुलभ होईल.
ओला Ace One शी करेल स्पर्धा
Honda Activa Electric Ola S One किंवा S One Pro शी टक्कर देऊ शकते, Honda ने अद्याप आपल्या powertrain बद्दल माहिती दिलेली नाही. ओलाच्या या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर अनुक्रमे 121 आणि 181 किमीची रेंज देण्यास सक्षम आहेत.