Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनची नाईटस्टर बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2022 Harley Davidson Nightster: Hero Motocorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे त्यांची नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. Harley Davidson Nightster नावाच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे.
2022 Harley Davidson Nightster: Hero Motocorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे त्यांची नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. Harley Davidson Nightster नावाच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे. या बाईकची बुकिंगही सुरू झाली आहे. देशातील हार्ले डेव्हिडसनचे डिलिव्हरी आणि अॅक्सेसरीज आता Hero MotoCorp च्या हातात आहे. सीबीयू मार्गाने ही बाईक देशात आणली जाणार आहे.
किंमत
नाईटस्टर ही हार्ले-डेव्हिडसनच्या स्पोर्टस्टर बाईक सीरिजमधील सर्वात कमी किमतीची बाईक आहे. जी Triumph Bonneville Bobber आणि Indian Scout Bobber सारख्या सेगमेंटमधील इतरबाईकला टक्कर देणार आहे. या बाईकचा एकच व्हेरियंट बाजारात सादर करण्यात आलाआहे. ही गनशिप ग्रे, विविड ब्लॅक आणि रेडलाइन रेड सारख्या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते. याच्या विविड ब्लॅक कलर 14.99 लाखांना उपलब्ध आहे. तर गनशिप ग्रे आणि रेडलाइन रेड 15.13 लाखांमध्ये उपलब्ध आहे.
लूक
Harley-Davidson Nightster ला बार-एंड मिरर, एक गोल हेडलाइट, साइड-स्लंग एक्झॉस्ट, गोल आकाराचे टर्न इंडिकेटर, कट शेप रिअर फेंडर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याचे वजन 218 किलो आहे, सीटची उंची 705 मिमी आहे. यामध्ये 11.7 लीटर क्षमतेची इंधन टाकी वापरण्यात आली आहे.
इंजिन
नाईटस्टरमध्ये 975cc V-ट्विन, लिक्विड-कूलिंग इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 7,500 rpm वर 89 bhp ची पॉवर आणि 5,750 rpm वर 95 Nm चे पीक टॉर्क जनरेट करू शकते. मारुतीच्या स्विफ्टमध्ये देखील जवळजवळ समान क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, 320mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 260mm रियर डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या :