Flying Car: आता कारमध्ये बसून घेता येणार गगन भरारीचा आनंद, जानेवारीत येतेय फ्लाईंग कार
Electric Flying Car: नवीन वर्षात 2023 मध्ये (New Year 2023) CSE म्हणजेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो आयोजित केला जाणार आहे. ऑटोमोबाईल उद्योगाच्या दृष्टीने हा शो खूप महत्त्वाचा आहे. कारण एकापेक्षा एक नवीन तंत्रज्ञानाने सज्ज असलेली वाहने त्यात दिसतात.
Electric Flying Car: नवीन वर्षात 2023 मध्ये (New Year 2023) CSE म्हणजेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो आयोजित केला जाणार आहे. ऑटोमोबाईल उद्योगाच्या दृष्टीने हा शो खूप महत्त्वाचा आहे. कारण एकापेक्षा एक नवीन तंत्रज्ञानाने सज्ज असलेली वाहने त्यात दिसतात. 2023 च्या CES मध्ये वाहनांमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. मोटार शोमध्ये फोक्सवॅगन आपली अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शित करेल, तर अनेक कंपन्या आपल्या विविध कार सादर करणार आहेत. परंतु या सर्वांमध्ये सर्वात मोठे आकर्षण केंद्र ठरणार आहे ती म्हणजे Flying Car. वाहन उत्पादक कंपनी Aska आपली ही कार (Electric Flying Car) सादर करणार आहे.
ऑटोमोबाईल कंपनी आस्का म्हणते की, ते रस्त्यावर तसेच हवेत उडण्यास सक्षम असलेली कार (Electric Flying Car) आणणार आहे. ही 4 सीटर कार असेल. याला इलेक्ट्रिक टेक-ऑफ आणि लँडिंग म्हणजेच eVTOL वाहन 5 ते 8 जानेवारी दरम्यान CSE 2023 मध्ये प्रदर्शित केले जाईल. कंपनी या वाहनाची पूर्ण आकाराची प्रोटोटाइप व्हर्जन सादर करेल. जी इलेक्ट्रिक कार तसेच क्वाडकॉप्टर आहे.
Electric Flying Car: Aska eVTOL ची काय आहे खासियत?
ही चार सीटर इलेक्ट्रिक कार (Electric Flying Car) असेल. ज्यामध्ये व्हीटीओएल म्हणजेच व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग, एसटीओएल म्हणजेच शॉर्ट टेकऑफ आणि लँडिंगचे तंत्र मिळेल. याची रेंज वाढवण्यासाठी यात लिथियम-आयन बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरसह संपूर्ण इलेक्ट्रिक सिस्टम मिळेल. याची फ्लाइंग रेंज 400 किमी पर्यंत असू शकते आणि याची टॉप फ्लाइंग स्पीड (Electric Flying Car) ताशी 240 किमी पर्यंत असणे अपेक्षित आहे.
हायवेवर ड्राईव्ह मोडमध्ये कार (Electric Flying Car) किमान 112 किमी प्रतितास या वेगात सक्षम असावी, अशी कंपनीची इच्छा आहे. कंपनी आपली पहिली कार (Electric Flying Car) देशांतर्गतच डिलिव्हरी करणार आहे. ही कार कधी बाजारात येईल याचा खुलासा कंपनीने अद्याप केलेला नाही. कंपनी जानेवारीमध्ये या कारचा फक्त प्रोटोटाइप सादर करणार आहे, ज्यावर बरेच काम करणे बाकी आहे.
इतर महत्वाची बातमी: