Top 5 Best Selling Electric Scooter : ओला ठरली सरस, विक्रीच्या बाबतीत 'या' इलेक्ट्रिक स्कूटरला टाकलं मागे
Best Selling Electric Scooter in May : मे महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरचीही प्रचंड विक्री झाली आहे. Ola S1 Pro हा या सेगमेंटमध्ये बेस्ट सेलर ठरली आहे.
Best Selling Electric Scooter in May : मे महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरचीही प्रचंड विक्री झाली आहे. Ola S1 Pro हा या सेगमेंटमध्ये बेस्ट सेलर ठरली आहे. मे महिन्यात Ola S1 Pro चे 9,225 युनिट्स विकले गेले. इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीच्या बाबतीत ओकिनावाची प्रेझ प्रो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर Ather 450 तिसऱ्या क्रमांकावर आणि TVS iCube चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय चेतक स्कूटरने पाचव्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले आहे.
Ola S1 Pro
किंमत: 1,39,999 रुपये
टॉप स्पीड: 115 किमी/ता
रेंज: 181 किमी
Ola ची S1 Pro ही मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची 9,225 युनिट्स विकली गेली. Ola चा S1 Pro एका चार्जवर 181km ची रेंज ऑफर करतो आणि याची टॉप स्पीड 115km/h आहे. S1 Pro पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात. यासोबत तुम्हाला यात रिव्हर्स मोड देखील मिळतो.
Okinawa Praise Pro
किंमत: 87,593 रुपये
टॉप स्पीड: 58 किमी/ता
रेंज: 88 किमी
Okinawa Praise Pro ने मे महिन्यात 7,339 युनिट्सची विक्री केली, ज्यामुळे ही या सेगमेंटमधील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनली. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी फक्त 3 तास लागतात. याच्या जलद चार्जिंगमुळे ही इतर स्कूटरपेक्षा वेगळी आहे.
Ather 450
किंमत: 1,31,646 रुपये
टॉप स्पीड: 80 किमी/ता
रेंज: 116 किमी
मे महिन्यात Ather 450 ची 3,667 युनिट्स विकली गेली आणि ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली. याची रेंज 116km आणि टॉप स्पीड 80km/h आहे. ही स्कूटर 4 तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
TVS iqube
किंमत: 1,56,514
टॉप स्पीड: 82 किमी/ता
रेंज: 145 किमी
मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत TVS ची iqube चौथ्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात iqube च्या 2,637 युनिट्सची विक्री झाली. iqube चा टॉप स्पीड 82km/h आणि रेंज 145km आहे. त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात.
चेतक
किंमत: 1,54,189
टॉप स्पीड: 70 km/h
रेंज: 90 किमी
मे महिन्यात चेतकच्या 2544 युनिट्सची विक्री झाली आणि यासह मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये ही 5वी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. चेतक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. याची रेंज 90km आणि टॉप स्पीड 70km/h आहे.