Best Cars Under 15 Lakhs: थोडं बजेट वाढवलं तर खरेदी करता येईल 'या' जबरदस्त कार, पाहा लिस्ट
Best Cars Under 15 Lakhs: जर तुम्ही स्वतःसाठी एक जबरदस्त एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 15 लाखांच्या आत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Best Cars Under 15 Lakhs: जर तुम्ही स्वतःसाठी एक जबरदस्त एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 15 लाखांच्या आत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात अनेकजण एसयूव्ही कार खरेदी करण्याचं स्वपन पाहतो, मात्र कमी बजेट किंवा इतर कारणांमुळे त्यांना ती खरेदी करता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतात 15 लाखांपेक्षा कमी किंमत उपलब्ध असलेल्या काही खास कारबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या कार्सबद्दल...
Best Cars Under 15 Lakhs: महिंद्रा थार
महिंद्रा थारच्या 4WD प्रकारात 150PS/320 Nm आउटपुटसह 2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 130PS/300Nm आउटपुटसह 2.2-लीटर डिझेल इंजिन मिळते. दोन्ही इंजिनांना सहा-स्पीड मॅन्युअल आणि सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. RWD प्रकारात 118PS/300Nm आउटपुटसह 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळते, जे केवळ 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यात क्रूझ कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट्स, इलेक्ट्रिक कंट्रोल एसी आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यासारखे फीचर्स आहेत.
Best Cars Under 15 Lakhs: टाटा नेक्सन
टाटा नेक्सन दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, 120PS आणि 170Nm च्या आउटपुटसह टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 110PS आणि 260Nm च्या आउटपुटसह 1.5-लिटर, चार-सिलेंडर, डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सहा-स्पीड AMT सह जोडलेले आहे. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, आठ-स्पीकर साउंड सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर क्वालिटी डिस्प्ले, एअर प्युरिफायर, व्हॉईस कमांड, कूल्ड. ग्लोव्हबॉक्स, मागील व्हेंटसह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन सेन्सिंग वायपर सारखे फीचर्स मिळणार.
Best Cars Under 15 Lakhs: महिंद्रा एक्सयूव्ही 700
SUV ला 200PS आणि 380Nm च्या आउटपुटसह 2-लीटर, टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 185PS आणि 450Nm च्या आउटपुटसह 2.2-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. दोन्ही इंजिनांना सहा-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. XUV700 मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, सहा-वे पॉवर ड्रायव्हर सीट, बिल्ट-इन अलेक्सा कनेक्टिव्हिटी आणि 12 स्पीकर यांसारखी फीचर्स मिळतात.
Best Cars Under 15 Lakhs: मारुती ब्रेझा
कारला 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS/137Nm जनरेट करते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. याच्या CNG प्रकाराला 88PS आणि 121.5Nm आउटपुट मिळते. याशिवाय यात एक इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, चार स्पीकर, पॅडल शिफ्टर्स, सिंगल-पेन सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग आणि वायरलेस फोन चार्जिंग सारखे फीचर्स मिळतात.