(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMW X3 Diesel SUV Launch : BMW X3 डिझेल भारतात लॉन्च, फक्त 7.9 सेकंदात पकडते 100 किमी प्रतितास वेग
BMW X3 Diesel SUV Launch : जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली नवीन X3 xDrive20d SUV चा डिझेल व्हेरियंट लॉन्च केला आहे.
BMW X3 Diesel SUV Launch : जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली नवीन X3 xDrive20d SUV चा डिझेल व्हेरियंट लॉन्च केला आहे. ही कार फक्त 7.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास गती प्राप्त करते. याची टॉप स्पीड 213 किमी प्रतितास इतकी आहे. BMW X3 सीरिजमध्ये दोन पेट्रोल कार यापूर्वीच लॉन्च करण्यात आल्या आहेत. आता याचा डिझेल व्हेरियंटही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे.
इंजिन
ग्राहकांना 2022 BMW X3 xDrive20d लक्झरी व्हेरियंटमध्ये पॉवर 2.0-लिटर फोर-सिलेंडर, ट्विंटर्बो डिझेल इंजिन पाहायला मिळेल. जे 190bhp पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ट्रान्समिशनद्वारे नियंत्रित केले जाते. यात 4 ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. ज्यात ECO PRO, COMFORT, SPORT, SPORT + मोड्सचा समावेश आहे.
फीचर्स
BMW X3 xDrive20d 2022 मॉडेलमध्ये मल्टी-फंक्शन स्पोर्ट स्टीयरिंग व्हील, मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, अॅम्बियंट लाइटिंग आणि थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. जी BMW जेश्चर कंट्रोलद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना वायरलेस अॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि हरमन कार्डन साउंड सिस्टम देखील मिळणार आहे. यात 2022 BMW X3 मध्ये 6 एअरबॅग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे.
किंमत
नवीन BMW X3 xDrive20d कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 65.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. भारतात याची स्पर्धा आगामी लँड रोव्हर (Land Rover), ऑडी (Audi) आणि व्होल्वो (Volvo) कारशी होईल. यामध्ये Audi Q5 आणि Volvo XC60 सारख्या कारचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
- New Baleno 2022 : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लॉन्च होणार मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
- Volkswagen mid-size sedan : 'या' दिवशी लॉन्च होणार फॉक्सवॅगनची मिड-साईज सेडान, मिळणार जबरदस्त फीचर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha