Petrol in Diesel Car : पेट्रोल गाडीत डिझेल अन् डिझेल गाडीत पेट्रोल भरलं तर...; 'गो मेकॅनिक' काय सांगतात?
कोणत्याही डिझेल वाहनात पेट्रोल किंवा पेट्रोल कार डिझेलने भरता येत नाही पण चुकून तुमच्या सोबत असं कधी झालं तर फार काळजी करण्याची गरज नाही.
Petrol in Diesel Car : कोणत्याही डिझेल (Auto News ) वाहनात पेट्रोल किंवा पेट्रोल कार डिझेलने भरता येत नाही, परंतु कधीकधी इंधन भरताना आपले लक्ष भरकटले जाऊ शकते किंवा पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या गोंधळामुळे आपल्या कारमध्ये चुकीचे इंधन भरले जाऊ शकते. अशावेळी जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर तुमच्या गाडीच्या इंजिनला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? याची तुम्हाला माहिती असायला हवी आणि अशी चूक कधी झाली तर तुम्ही काय करू शकता हेही तुम्हाला माहित असायला हवं.
'गो मेकॅनिक' काय म्हणतात?
गो मेकॅनिक या स्टार्टअप कार सर्व्हिसिंग कंपनीने ब्लॉगच्या माध्यमातून दोन्ही परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका स्थितीत तुमची कार पेट्रोल इंजिन असून त्याच्या टाकीत डिझेल टाकावे आणि दुसऱ्या स्थितीत डिझेल इंजिन असलेल्या कारच्या टाकीत पेट्रोल भरले पाहिजे. गो मेकॅनिकचा ब्लॉग या दोन्ही परिस्थितीत खबरदारी समजावून सांगतो.
पेट्रोल कारमध्ये डिझेल भरलं तर?
पेट्रोल कारमध्ये डिझेल भरणे फारसे हानिकारक नाही, अशा वेळी चुकूनही इंजिन स्टार्ट करू नये. त्यामुळे गाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही. दुसरीकडे कारच्या टँकमध्ये डिझेलचे प्रमाण 5% पेक्षा कमी असेल तरीही काही फरक पडणार नाही, अशा परिस्थितीत तुम्ही तुमची कार चालवू शकता. पण हे प्रमाण जास्त असेल तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. टाकीत पाच टक्क्यांपेक्षा जास्त डिझेल पडल्यास इंजिन स्टार्ट न करता ताबडतोब जवळच्या मेकॅनिकला फोन करून संपूर्ण टाकी रिकामी करावी. पण जर तुम्ही काही काळ कार चालवत असाल तर अशावेळी तुम्हाला टँक पूर्णपणे रिकामी केल्यानंतर संपूर्ण इंजिन साफ करावे लागेल.
डिझेल कारमध्ये पेट्रोल भरले की काय होते?
डिझेल इंजिनमध्ये पेट्रोल टाकले तर डिझेल मध्ये पेट्रोल मिसळले की ते सॉल्व्हंटचे काम करू लागते, याचा परिणाम वाहनाच्या इंजिनवर होतो. कारण डिझेल कारला पॉवर तर देतेच,लुब्रिकेशन ऑईल सारखं काम करतं. डिझेल कारमध्ये पेट्रोल पडल्याने मशिनच्या भागांमधील फ्रिक्शन वाढते आणि त्यामुळे इंधन मार्गावरील पंपावर परिणाम होऊ लागतो. अशा स्थितीत इंजिन चालू ठेवल्यास किंवा पेट्रोल भरल्यानंतरही गाडी चालवल्यास कारचे इंजिन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकून डिझेलऐवजी तुमच्या गाडीत पेट्रोल पडल्यास ताबडतोब गाडी मेकॅनिककडे घेऊन जा.
इतर महत्वाची बातमी-