एक्स्प्लोर

Hyundai EV Charging Station : Hyundai ने देशभरात 11 नवीन DC फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारले; सर्व EV ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध

Hyundai Motor : नवीन फास्ट चार्जर व्यतिरिक्त, Hyundai ने आपल्या "myHyundai" स्मार्टफोन ॲपवर 2,900 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंटला मॅप केले आहेत.

Hyundai Motor : दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल (Automobile) कंपनी ह्युंदाईने (Hyundai) भारतात आपले सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ह्युंदाई कंपनीने देशभरात 11 नवीन DC फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारले आहेत.  या स्टेशन्समध्ये 150kW, 60kW आणि 30kW क्षमतेचे फास्ट चार्जरचा समावेश करण्यात आला आहे. हे चार्जिंग स्टेशन्स मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, गुरुग्राम आणि बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये तसेच प्रमुख महामार्गांवर बसविण्यात आले आहेत. 24x7 उपलब्ध, हे चार्जर Hyundai आणि बिगर Hyundai दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. हे चार्जिंग स्टेशन सर्व ईव्ही ग्राहक वापरू शकतात. 

ईव्ही चार्जिंग सोपे होईल

नवीन फास्ट चार्जर व्यतिरिक्त, Hyundai ने आपल्या "myHyundai" स्मार्टफोन ॲपवर 2,900 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंटला मॅप केले आहेत. हे ॲप ह्युंदाई नसलेल्या ग्राहकांसाठी देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे चार्जिंग पॉइंट देशातील सर्व ईव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यांची वाहने चार्ज करताना, ग्राहक या जलद चार्जिंग स्टेशनवर कॉफी शॉप्स आणि रेस्टॉरंट्स सारख्या सुविधांचा आनंद घेऊ शकतात.

Hyundai चे भविष्यातील नियोजन 

या नवीन चार्जिंग स्टेशन्सवर वाहने चार्ज करण्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 30kW चार्जरसाठी प्रति युनिट 18 रु. 60kW चार्जरसाठी 21 रुपये प्रति युनिट आणि 150kW फास्ट चार्जरसाठी 24 रुपये प्रति युनिट दरांचा समावेश आहे. ह्युंदाईने 11 नवीन चार्जिंग स्टेशन्स सुरु केलेले असतानाच 2024 पर्यंत किमान 10 नवीन ठिकाणी डीसी चार्जिंग नेटवर्क (DC Charging Network) उभारण्याची देखील कंपनीची योजना आहे. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर मीटमध्ये तामिळनाडू सरकारबरोबर झालेल्या करारानुसार 2027 पर्यंत 100 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

EV काही मिनिटांत चार्ज होईल

ही अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशन्स ग्राहकांना त्यांची वाहने जलद आणि कार्यक्षमतेने चार्ज करण्यास अनुमती देतात. उदाहरणार्थ, Hyundai IONIQ 5, Hyundai च्या इलेक्ट्रिक वाहन मॉडेलपैकी एक, हे चार्जर वापरून फक्त 21 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज केले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेली ही सुविधा आणखी चांगली ठरणार आहे. 

MyHyundai ॲपचा वापर करा 

लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी प्रवाशांना अनेकदा गाड्यांना चार्ज करावं लागतं. अशा वेळी वेळेवर चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नसतात. यासाठी ग्राहक चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी, नेव्हिगेट करण्यासाठी, प्री-बुक चार्जिंग स्लॉट्स, डिजिटल पेमेंट करण्यासाठी आणि चार्जिंग स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी MyHyundai ॲप वापरू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या :

Upcoming Electric SUVs : Hyundai आणि Honda च्या दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच भारतात होणार लॉन्च; तुमच्या पसंतीची कार कोणती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget