Auto Expo 2023 : ऑटो एक्सपोमध्ये MG 4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च, जाणून घ्या काय आहे खास?
MG 4 Electric Car: MG च्या या कारची लांबी 4.2 मीटर आहे. कारच्या लांबीमुळे ही इलेक्ट्रिक कार आरामदायी आणि प्रशस्त केबीन देते
MG New Electric Car The 4: भारतात कमी वेळात ग्राहकांच्या मनात घर केलेली कंपनी म्हणजे MG.नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये MG ने आपली आलिशान 'The 4 EV'ही इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. जर ही कार खरेदी करायचा तुम्ही विचार करत असाल तर या कारविषयी अधिक माहिती जाणून घेऊया
The 4 EV पॉवर
MG ने आपली नवी हॅचबॅक कार MSP प्लॅटफॉर्मवर MSP (Maserati Stability Program) तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या या नव्या हॅच बॅक कारमध्ये 51kWh ते 64kWh बॅटरी पॅक पाहायला मिळणार आहे. एका चार्जमध्ये ही कार 350 Km अंतर धावणार आहे
The 4 EV Dimension
MG च्या या कारची लांबी 4.2 मीटर आहे. कारच्या लांबीमुळे ही इलेक्ट्रिक कार आरामदायी आणि प्रशस्त केबीन देते. कारचा लूक हा प्रीमियम हॅचबकचा अनुभव देते
The 4 EV Feature
MG ने आपल्या इलेक्ट्रिक कार केबिनमध्ये नव्या डिझाईनच्या डॅशबोर्डचा प्रयोग केला आहे. तसेच वेगळा लूक देण्यासाठी इन्स्ट्रुंमेट क्लस्टर साईज छोटी करण्यात ली आहे. कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन पाहायला मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ADAS सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे. जी MG ZS प्रमाणे असणार आहे.
The 4 EV Price
एमजी ऑटो एक्सपोमध्ये या आलिशान कारची किंमतही जाहीर केली आहे. या कारची किंमत 14,72,800 रुपये असणार आहे. अवघ्या काही वर्षांत MG ने भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे MG कारमध्ये दिलेले नवीन तंत्रज्ञान. सध्या कार खरेदी करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडून नव्या Technology ला महत्त्व दिले जात आहे. एमजी आपल्या कारमध्ये ती सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या अत्याधुनिक कारमध्ये असणे आवश्यक आहे.
नोएडामध्ये देशातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण गाड्याही बघायला मिळणार आहे. 18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्स्पो चालणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Auto Expo 2023 Live Updates : देशातील सर्वात मोठा 'ऑटो एक्स्पो' आजपासून सुरु