एक्स्प्लोर

किंमत 98 लाख, वेग 5 सेकंदात 100 किमी, ऑडीची Q7 Bold बाजारात दाखल, जाणून घ्या फिचर्स अन् बरेच काही

बोल्‍ड एडिशनमध्‍ये ग्‍लॉस ब्‍लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज, ब्‍लॅक विंडो सराऊंड्स, ब्‍लॅक ओआरव्‍हीएम आणि ब्‍लॅक रूफ रेल्‍स आहेत. 97, 48,000  रूपये किंमत असलेली ही बोल्‍ड एडिशन निश्चितच वैयक्तिक अभिव्‍यक्‍ती व्‍यक्‍त करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेईल.

Audi India launches Audi Q7 Bold Edition : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज ऑडी क्‍यू7 बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची केली. ऑडीच्या या अलिशान कारमध्ये आकर्षक ब्‍लॅक डिझाइन आहे तसेच आकर्षकता व अत्‍याधुनिकताही आहे. बोल्‍ड एडिशनमध्‍ये ग्‍लॉस ब्‍लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज, ब्‍लॅक विंडो सराऊंड्स, ब्‍लॅक ओआरव्‍हीएम आणि ब्‍लॅक रूफ रेल्‍स आहेत. 97, 48,000  रूपये किंमत असलेली ही बोल्‍ड एडिशन निश्चितच वैयक्तिक अभिव्‍यक्‍ती व्‍यक्‍त करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेईल. मर्यादित युनिट्स उपलब्‍ध असण्‍यासह ऑडी क्‍यू7 बोल्‍ड एडिशन ग्‍लेशियर व्‍हाइट, मिथोज ब्‍लॅक, नवारा ब्‍ल्‍यू आणि समुराई ग्रे या चार एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्हणाले, “ऑडी क्‍यू७ ऑडी क्‍यू समूहामधील आयकॉन राहिली आहे, ज्‍यामध्‍ये उल्‍लेखनीय ड्रायव्हिंग गतीशीलतेसह अविश्‍वसनीय वैविध्‍यतेचे उत्तम संयोजन आहे. या बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना विशिष्‍ट स्‍टायलिंग घटकांनी युक्‍त अधिक आकर्षक व्‍हेरिएण्‍ट प्रदान करत आहोत, जेथे ही वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ऑडी क्‍यू7स्‍पेशल एडिशन शक्तिशाली स्‍टेटमेंट करण्‍याची आणि आरामदायीपणा, आकर्षकता व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या परिपूर्ण मिश्रणाचा शोध घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.'' 

बोल्‍ड एडिशनची वैशिष्‍ट्ये: ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज ऑडीमध्‍ये आकर्षक सुधारणांची भर करते. हे पॅकेज ग्रिलवरील हाय-ग्‍लॉस ब्‍लॅक फिनिश, ब्‍लॅक ऑडी रिंग्‍ज (फ्रण्‍ट व रिअर), विंडो सराऊंड्स, एक्‍स्‍टीरिअर मिरर्स (ओआरव्‍हीएम) आणि रूफ रेल्‍ससह आकर्षक लुक देते.

ऑडी क्‍यू 7 ची इतर ठळक वैशिष्‍ट्ये:

3 लीटर व्‍ही6 टीएफएसआय इंजिनच्‍या शक्‍तीसह 48 व्‍होल्‍ट माइल्‍ड-हायब्रिड सिस्‍टम आणि लीजेण्‍डरी क्‍वॉट्रो ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह

340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्कची निर्मिती

250 किमी/तास अव्‍वल गती आणि फक्‍त 5.6 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते.

48.26 सेमी (आर19) 5-आर्म स्‍टार-स्‍टाइल डिझाइन अलॉइ व्‍हील्‍स

 मॅट्रिक्‍स एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह सिग्‍नेचर डेटाइम रनिंग लाइट्स

 एलईडी टेल लॅम्‍प्‍ससह डायनॅमिक टर्न इंडीकेटर्स

सात ड्राइव्‍ह मोड्स (ऑटो, कम्‍फर्ट, डायनॅमिक, एफिशिएन्‍सी, ऑफ-रोड, ऑल-रोड आणि इंडिव्हिज्‍युअल)

पॅनोरॅमिक सनरूफ

 अॅम्बियण्‍ट लायटिंग पॅकेज प्‍लस, प्रत्‍येक पृष्‍ठभाग व कॉन्‍चर लायटिंगसाठी 30 रंगांसह कस्‍टमायझेबल

ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस

ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस

 एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय टच रिस्‍पॉन्‍स

बीअँडओ प्रीमियम ३डी साऊंड सिस्‍टमसह १९ स्‍पीकर्स आणि ७३० वॅट्सचे एकूण पॉवर आऊटपुट

अॅडप्‍टिव्‍ह विंडशील्‍ड वायपर्ससह इंटीग्रेटेड वॉशर नोझल्‍स

जेन्‍यूएन क्रिकेट लेदर अपहोल्‍स्‍टरी

7-सीटरसह तिसऱ्या रांगेमध्‍ये इलेक्ट्रिकली फोल्‍डेबल सीट्स

4-झोन एअर कंडिशनिंगसह एअर आयनोझर व अॅरामेटायझेशन

कीलेस प्रवेशासाठी कम्‍फर्ट की आणि इलेक्ट्रिक बूट लिडसह गेस्‍चर-आधारित ऑपरेशन

क्रूझ कंट्रोलसह स्‍पीड लिमिटर

पार्क असिस्‍ट प्‍लससह 3600 कॅमेरा

लेन डिपार्चर वॉर्निंग

अधिक सुरक्षिततेसाठी 8 एअरबॅग्‍जसह सुसज्‍ज  

ऑडी जेन्‍यूएन अॅक्‍सेसरीज (पर्यायी)

ड्युअल टोन अलॉई व्‍हील पेंट (पर्यायी)

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget