एक्स्प्लोर
Advertisement
आठवले, मेटे आणि जानकरांना युतीच्या मेळाव्याचं बोलावणं नाही, चौथ्या आघाडीच्या चर्चांना उधाण
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने आज औरंगाबात येथे महामेळावा आयोजित केला होता. परंतु शिवसेना आणि भाजपने युतीतल्या मित्रपक्षांना या मेळाव्याचे निमंत्रण न दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने आज औरंगाबात येथे महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. परंतु महायुतीतले मित्रपक्ष असलेल्या रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट),राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्षाच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलेलं नव्हतं. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मित्र पक्षांविनाच आज औरंगाबादेत महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे सेना-भाजपच्या युतीनंतर मित्रपक्ष अडगळीत पडल्याचे चित्र सध्या पाहायला आहे. परंतु आम्हीसुद्धा रेसमध्ये आहोत, असं म्हणत जानकर अधून-मधून चौथ्या आघाडीचा इशारादेखील देत आहेत.
वाचा : आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा, रामदास आठवलेंचा भाजपला इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
महाराष्ट्र
पुणे
Advertisement