एक्स्प्लोर

ठाकरी तोफेच्या निशाण्यावर कोण? औरंगाबादमध्ये आज धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ

Shiv Sena CM Uddhav Thackeray Rally Today : औरंगाबादमध्ये आज धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, सभास्थळी ठेवलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याची चर्चा, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता

Shiv Sena CM Uddhav Thackeray Rally Today : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. तब्बल 15 अटी शर्थींसह मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये (Aurangabad) 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. 

आजच्या सभेतच मुख्यमंत्री औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादमधील ज्या मैदानावर पार पडणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. तर 8 मे 1988 मध्ये याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादच संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच नेते संभाजीनगर असाच उल्लेख करतात. त्यामुळे बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची (Sambhajinagar) घोषणा करू शकतात, असं म्हटलं जात आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेच्या निमित्तानं आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे, सभेच्या स्टेजसमोर उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. शिवसेनेच्या सभेत पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत औरंगाबादचं नामांतर करत संभाजीनगर झाल्याची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. 

निवडणूक आणि नामांतराचा मुद्दा... महत्त्व काय? 

निवडणुका आल्या की महाराष्ट्रात एक विषय हमखास चर्चिला जातो. आणि तो इतका हॉट आणि हिट होतो, की तिच्यावर सगळेच राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलायला लागतात. तो विषय म्हणजे संभाजीनगर की औरंगाबाद. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्याशिवाय होऊच शकत नाही. अनेक वर्षे या मुद्यावरून महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुद्धा नामांतराच्या विषय आघाडीवर असण्याची शक्यता आहे.

सभेसाठी 'या' अटी-शर्थी :

जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये, अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण आणि नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील,यासह एकूण 15 अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
ओबीसी समाज लोकसभेचा बदला घेणार, विधानसभेला तुतारीचे सर्व उमेदवार आडवे करणार: लक्ष्मण हाके
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
Embed widget