एक्स्प्लोर

कोरोनात पाणीपुरी खायला घाबरू नका! औरंगाबादच्या दोन तरुणांनी बनवलं पाणीपुरीचं मशीन

कोरोना संसर्गात पाणीपुरी खायला घाबरू नका! कारण, औरंगाबादच्या दोन तरुणांनी पाणीपुरीचं मशीन बनवलं आहे. आता सुरक्षितरित्या तुम्हाला पाणीपुरीचा आनंद घेता येणार आहे.

औरंगाबाद : पाणीपुरी म्हणलं की अनेकांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. मात्र, कोरोनामुळे आपल्या आवडीची पाणीपुरीची चव चाखणे देखील अवघड झाले आहे. पाणीपुरी खावी तर आपल्याला कोरोना तर होणार नाही ना? अशी भीती वाटत असल्याने अनेकांना हवीहवीशी वाटणारी पाणीपुरी खाणं टाळत आहेत. मात्र, यावर औरंगाबादच्या पितळे बंधूनी भन्नाट शक्कल लढवत पाणीपुरीचे मशीन तयार केले. या मशीनमुळे कोणाचेही हात न लागता सुरक्षितपणे पाणीपुरी खाता येणार आहे.

पाणीपुरी म्हटलं, की आपोआप जिभेवर तिची चव रेंगाळायला सुरुवात होते. कधी चटपटीत, तर कधी डोळ्यात पाणी आणणारे तिखट पाणी अशी पाणीपुरी खाणे जणू अनेकांच्या सवयीचा भाग. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून बहुतांश पाणीपुरी प्रेमींनी चक्क तिच्याशी काडीमोडच घेतला आहे. कोरोनामुळे लाडक्या पाणीपुरीचा जणू द्वेष अनेकजण करू लागले. पाणीपुरी खाताना ती देणाऱ्या भैय्याचे हात वारंवार पाण्यात जातात. त्याच हाताने उष्ट्या प्लेट उचलून पाण्यात धुतात. त्यामुळे अनेकजण आधीच पाणीपुरी खाणे टाळत होते. ज्यांना पाणीपुरी आवडते ते या गोष्टींकडे कानाडोळा करून ताव मारल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, कोरोनामुळे या खवैय्यांनी देखील पाणीपुरी खाणे सोडले. त्यावर पितळे बंधूनी कायमस्वरूपी उपाय शोधून काढलाय. पाणीपुरी प्रेमींसाठी या बंधूनी चक्क पाणीपुरीचं मशीन तयार केलं आहे!

या मशीनमध्ये तीन बाजूंनी कोणाचाही स्पर्श न होता आपल्याला आपली आवडीची पाणीपुरी खाता येते. मशीनच्या प्रत्येक बाजूला सेन्सर लावण्यात आले आहेत. त्या सेन्सरच्या माध्यमातून पाच वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी खाता येते. आपल्या हवी असलेली चव निवडायची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या पाईप जवळ पुरी नेली की आपोआप त्यात पाणी पडते, आणि आपण आपली आवडीची पाणीपुरी खाऊ शकतो. त्यामुळे पाणीपुरी प्रेमी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली देखील आवडीचा पदार्थ त्याच आनंदाने पाणीपुरी खाऊ शकतात.

समीर पितळे आणि प्रतिक पितळे या बंधूनी हे 'पाणीपुरी मशीन' तयार केले आहे. समीर मेकॅनिकल इंजिनियर तर प्रतिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. समीरला पाणीपुरी खूप आवडते. कंपनीत कामावरून परत येताना समीर रोज पाणीपुरी खायचा. एक दिवस तो आजारी पडला. अनेक उपचार केले मात्र प्रकृतीत सुधात होत नव्हती. त्यावेळी पाणीपुरीमुळे हा त्रास होत असल्याचे त्याला कळाले. त्यात कोरोनामुळे पाणीपुरी खाताना भीती आणखी वाढली. त्यावेळी पाणीपुरी खाताना आरोग्य चांगले राहावे यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्यावर समीरने प्रतिक सोबत चर्चा केली आणि त्याबाबत कामही सुरू केले. त्यामुळे अनलॉक झाल्यावर पितळे बंधूनी पाणीपुरीचे मशीन सुरू केले. या एटीएममुळे कोणाचाही स्पर्श न होता पाणीपुरी खाणे खवैय्यांना शक्य झाले आहे. हे एटीएम तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला असून जवळपास 60 हजारांचा खर्च लागला आहे. या मशीनची माहिती मिळताच काही जणांनी मशीन तयार करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती प्रतीक पितळे यांनी दिली. त्यामुळे या नवसंशोधकांच्या संशोधनामुळे बाखरवडी चितळे आणि पाणीपुरीत पुतळे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
पदवीधर निवडणूकीवरून महायुतीत बेबनाव! शिंदेसेनेनं सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले...
पदवीधर निवडणूकीवरून महायुतीत बेबनाव! शिंदेसेनेनं सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले...
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget