एक्स्प्लोर

स्वत: न्यायाधीश असल्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्या चित्रा वाघ यांना...; मानहानीचा दावा न्यायालयाने स्वीकृत केल्यानंतर मेहबूब शेख यांची फेसबुक पोस्ट

NCP Mehboob Shaikh On BJP Chitra Wagh: राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर केलेला मानहानीचा दावा शिरुर न्यायालयाकडून स्वीकृत करण्यात आला आहे. 

मुंबई: भाजपच्या चित्रा वाघ यांनी स्वत: न्यायाधीश असल्यासारखं बेताल वक्तव्य केलं आणि आपली बदनामी केली, त्यामुळे त्यांच्याविरोधात आपण कायदेशीर लढाईचं पहिलं पाऊल टाकलं आहे असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात मेहबूब शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर मेहबूब शेख यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. तो आज शिरूरच्या न्यायालयाने स्वीकृत केला. 

Mehboob Shaikh Facebook Post: मेहबूब शेख यांची फेसबुक पोस्ट 

संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल. स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा. स्वतःला न्यायधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्याविषयी जी बदनामीकारक वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्याच्यानंतर शिरूरच्या न्यायालयामध्ये कलम 499 आणि 500 प्रमाणे क्रिमिनल डीफामेशनची खाजगी तक्रार दाखल केली. माननीय कोर्टाने 202 प्रमाणे पोलीस चौकशी करून त्या पोलिस चौकशीच्या अहवालानंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे.

काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खूप शहाणे असल्याचं समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. स्वतःला अतिहुशार समजणाऱ्यांना आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निश्चितपणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.

काय आहे प्रकरण? 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला होता. या प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आणि मेहबूब शेख यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. नंतर याच मुलीने घुमजाव करत भाजपच्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितलं होतं असं म्हटलं होतं. 

या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 02 November 2024Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रियाAnis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेले अनिस अहमद पुन्हा स्वगृहीSanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Embed widget