एक्स्प्लोर

Aurangabad: भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस

Aurangabad News: एका याचिकेवर सुनावणी करतांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावून संचालक ईडी (ED) यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.  

Aurangabad News: आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच (सक्तवसुली संचालनालय) आता नोटीस मिळाली आहे. एका भाजप आमदाराच्या (BJP MLA) बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जाची दखल न घेतल्याने अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव (High Court Of Bombay-Aurangabad Bench) घेतली आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावून संचालक ईडी (ED) यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.  

काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी ईडीकडे एक अर्ज करत, पुणे येथील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यांचे पुतणे भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यासह कुटुंबातील पाच जणांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती.मात्र त्यांच्या अर्जाचा कोणताही विचार ईडीकडून करण्यात आला नाही. त्यामुळे कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. 

यांच्या चौकशीची मागणी...

सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पुतणे आ. रमेश कराड, राजेश काशिराम कराड, काशिराम दादाराव कराड आणि तुळशीराम दादाराव कराड यांच्या बेहिशोबी मालमत्तेसंबंधी सक्तवसुली संचलनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र त्यांच्या अर्जाकडे ईडीकडून दुलर्क्ष करण्यात आले आणि त्याची दाखल घेण्यात अली नसल्याचा आक्षेप श्रीपती कराड यांनी घेतला आहे. 

पुढील सुनावणी 20 सप्टेंबरला 

याप्रकरणी खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. पुढील सुनावणी 20 सप्टेंबर 2022 रोजी होणार असून, तोपर्यंत कराड कुटुंबियांच्या बेहिशोबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. 

ईडीला नोटीस

श्रीपती कराड यांनी दाखल केलेल्या याचिकेत, याचिकाकर्ता हा शेतकरी असून त्यांनी अनेक तक्रारी कराड कुटुंबीयांच्या विरोधात केल्या आहेत. मात्र केवळ भाजपचे आमदार असल्यामुळे ईडीकडून त्यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे. तर याप्रकरणी खंडपीठाने नोटीस बजावून ईडी संचालकयांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट; ठाकरे-शिंदे गटातील वादावरच्या अनेक घटनात्मक प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; कालच्या अभूतपूर्व राड्यानंतर आज काय होणार याकडे लक्ष, आतापर्यंत काय काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Breaking News : मोठी बातमी! सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न; सुवर्ण मंदिराबाहेर द्वारपाल म्हणून 'शिक्षा' भोगत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न
सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न; सुवर्ण मंदिराबाहेर जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking News : मोठी बातमी! सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न; सुवर्ण मंदिराबाहेर द्वारपाल म्हणून 'शिक्षा' भोगत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न
सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न; सुवर्ण मंदिराबाहेर जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Embed widget