Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले; ठिकठिकाणी रोषणाई; प्रशासनाची परीक्षा
Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, महत्वाचे चौक, रस्ते आणि पर्यटन स्थळे रोषणाई नटली आहे.
![Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले; ठिकठिकाणी रोषणाई; प्रशासनाची परीक्षा maharashtra News Chatrapati Sambhaji Nagar News Chhatrapati Sambhajinagar city was set up for the G20 conference Lighting in the right place Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले; ठिकठिकाणी रोषणाई; प्रशासनाची परीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/58390b4c8c73800b5aba286d9b6f080e1677299517856443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 (G-20) परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळालेला आहे. त्यामुळे देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-20 च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे. दरम्यान 27 आणि 28 फेब्रुवारीला जी-20 परिषेदच्या 250 विदेशी महिलांचा पथक छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, महत्वाचे चौक, रस्ते आणि पर्यटन स्थळे रोषणाई नटली आहे.
जी-20 परिषदेच्या निमित्ताने 27 व 28 फेब्रुवारी रोजी परिषदेत पाहुण्यांसाठी विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 27 रोजी जी-20 अंतर्गत वूमन-20 या परिषदेचे उद्घाटन होईल. तर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची रिषदेसाठी उपस्थिती असेल. या दरम्यान पाहुणे वेरुळ लेणी व परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देतील. 28 रोजी सायंकाळी वेरुळ लेणी परिसरातील अभ्यागत केंद्र येथे डिनर होईल. पाहुण्यांसाठी दहा ई-बस असणार आहे. त्यामुळे ज्या भागात आणि ज्या रस्त्यांनी हे विदेशी पाहुणे जाणार आहेत, त्याठिकाणी विशेष रोषणाई करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची उजळणी
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी सायंकाळी दोन तास नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची उजळणी घेतली. कुणीही हलगर्जी करू नये, जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच दोन विमानांतून पाहुणे येतील. विमानतळावर लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत व निरोप दिला जाईल. पुष्पगुच्छ, भेटवस्तू देण्याची रंगीत तालिम घेण्यात आली आहे. तसेच यासाठी तीन कंट्रोल रूम असणार आहेत. विमानतळ, रामा हॉटेल, वेरूळ लेणी येथे कंट्रोल रूम असणार आहेत. वाहनचालकांना पांढरा गणवेश बंधनकारक असणार आहे.
पालकमंत्र्यांकडून पाहणी दौरा!
शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहे. यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जी-20 निमित्त झालेल्या सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे विविध कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याची सकाळी 10 वाजता विमानतळापासून सुरुवात होऊन बीबी का मकबरा या ठिकाणी सांगता झाली. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी सुशोभीकरण साठी लावण्यात आलेल्या झाडे उन्हामुळे सुकून जाऊ नये याची काळजी घेण्याची सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह वेगवेगळ्या खात्याचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiyaz Jaleel: जी 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून जलील यांचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)