एक्स्प्लोर

Crime News: 'लुटेरी दुल्हन'सह तिच्या साथीदारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जातही खोटी सांगितली

Aurangabad Crime News: लग्नासाठी मुलाच्या वडिलाकडे दीड लाख रुपये मागितले होते

Aurangabad Crime News: बनावट लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या कुटुंबाला लुटणाच्या टोळीचा औरंगाबाद ग्रामीणच्या पैठण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, लुटेरी दुल्हनसह तिच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे एका तरुणाची होणारी मोठी फसवणूक टळली असून, त्याचे दीड लाख रुपये देखील वाचले आहे. आंबादास नवनाथ नागरे (रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर, ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण), राजु अंकुश चाबुकस्वार (वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना) उमेश गणेश गिरी (वय 22 वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना) शिला मनोहर बनकर (वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद) असे आरोपींचे नावं आहेत. 

पैठण परीसरात बनावट लग्नाच्या घटना वाढल्या असल्याने पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत सुचना करत या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पैठण पोलिसांकडून या टोळीचा शोध घेतला जात होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास नाथ मंदिर पार्किंग परीसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत वधु व वराच्या वेषात असलेल्या व्यक्तींची विचारपुस केली. मात्र यावेळी वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांमुळे पैठण पोलीसांचा सदर लग्नाबाबत संशय वाढल्याने वधु पक्ष व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. 

मुलाकडच्या लोकांना अशाप्रकारे फसवलं 

दोन्ही पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी प्रकाश गणेश मोरे (वय 24 वर्षे रा. टाकेशिवणी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) या युवकाचे लग्न जुळत नव्हते.  दरम्यान आंबादास नागरे याने प्रकाशच्या वडिलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन, तिला आई वडील नाही व एक भाऊ असल्याचं सांगितले. ती मुलगी परिस्थीने गरीब आहे. तसेच तुमच्या मुलाचे तिच्यासोबत लग्न लावुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्या मोबदल्यात दीड लाख द्यावे लागतील असे सांगितले. मुलाला मुली मिळत नसल्याने मुलाच्या वडिलांनी देखील नागरेला होकार दिला. त्यानुसार नागरे याने मुलाकडच्या कुटुंबातील सदस्यांना मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन लग्नाची तयारी करण्यासाठी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे एकुन 18 हजार 758 रुपयांचे खरेदी करण्यास भाग पाडले. पण याची माहिती पोलिसांना मिळाली आणि बनावट नवरीसह टोळीचा भांडाफोड झाला. 

जातही खोटी सांगितली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी हे वेगवेगळ्या जातीधर्माचे असतांना त्यांनी मुलाच्या वडीलांना वधु ही त्यांच्या जाती व धर्माची असल्याची बतावणी केली. त्यामुळे आपल्याच जातीची मुलगी असल्याने मुलाच्या वडिलांनी लग्नासाठी लगेच होकार दिला. पुढे याचा फायदा घेत नागरेसह त्याच्या साथीदारांनी स्वतःचा आर्थीक लाभ मिळवण्यासाठी बनावट लग्नाचा बनाव करुन मोरे कुटुंबाची फसवणूक केली. तसेच या टोळीने औरंगाबाद, जालना, अहमदनगर येथे तसेच परराज्यात देखील यापुर्वी याप्रकारचे बनावट लग्न केले असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यानुसार तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget