Measles Disease: औरंगाबाद शहरात गोवरबाधितांची संख्या वाढली, आणखी 6 रुग्णांची भर
Aurangabad Measles Disease Update: औरंगाबाद शहरातील गोवर बाधितांची संख्या आता 10 झाली आहे.
![Measles Disease: औरंगाबाद शहरात गोवरबाधितांची संख्या वाढली, आणखी 6 रुग्णांची भर maharashtra News Aurangabad News The number of measles cases increased in Aurangabad city Addition of 6 more patients Measles Disease: औरंगाबाद शहरात गोवरबाधितांची संख्या वाढली, आणखी 6 रुग्णांची भर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/4d3860e8138ceaad211093ead492b0c51669704863780290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Measles Disease Update: औरंगाबाद शहरात गोवरचा धोका काही कमी होतांना दिसत नसून, दिवसेंदिवस गोवरबाधितांच्या संख्येत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता औरंगाबाद शहरात बुधवारी आणखी गोवरबाधित (पॉझिटिव्ह) सहा बालके आढळून आली असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे. त्यामुळे शहरात गोवर पॉझिटिव्ह बालकांची संख्या 10 झाली आहे.
सुरवातीला मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या गोवरचे रुग्ण राज्यातील इतर शहरात देखील आढळून येत असल्याचे चित्र आहे. त्यातच औरंगाबाद शहरात देखील गोवरचे रुग्ण वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता बुधवारी यात आणखी भर पडली असून, आणखी 6 नवीन रुग्ण आढळून आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील गोवर बाधितांची संख्या आता 10 झाली आहे. तर बुधवारी 6 संशयीत रुग्ण आढळून आल्याने संशयित बालकांची संख्या 66 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, बुधवारी 6 गोवर पॉझिटिव्ह बालके आढळून आली आहे. रहेमानिया कॉलनी, आरेफ कॉलनी, चिकलठाणा भागातील हीनानगर आणि पटेलनगर, विजयनगर गारखेडा, संजयनगर-बायजीपुरा या ठिकाणची ही बालके आहेत. या सर्व संशयीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आरोग्य विभाग अलर्ट...
औरंगाबाद शहरात गोवर रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेची आरोग्य विभाग खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. शहरातील ज्या भागात संशयीत रुग्ण आढळून येत आहेत, त्याठिकाणी विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर सोबतच संशयीत बालकांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे शहरातील गोवर रुग्णांची वाढ होताच आरोग्य विभाग खडबडून जागी झाल्याचे चित्र आहे.
लसीकरणावर भर...
शहरात आतापर्यंत 10 गोवर रुग्ण आढळून आली असून, 66 संशयीत बालके आढळली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शहरात लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. ज्या भागात गोवर पॉझिटिव्ह किंवा संशयीत रुग्ण आदळून येत आहेत, त्या भागात लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. सोबतच याबाबत सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्या बालकांची यादी तयार करण्यात येत आहे.
Measles Disease: औरंगाबादमध्ये एकाच दिवसात गोवरची नऊ संशयीत बालके; घाटीत स्वतंत्र व्यवस्था
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)