Aurangabad: ढाब्यावर दारू पिण्यासाठी बसणं पडलं महागात, न्यायालयाने थेट सुनावली कारवासाची शिक्षा
Aurangabad Crime News: या निकालामुळे मद्यपी व हॉटेल व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
Aurangabad Crime News: दोन पैसे वाचवण्यासाठी ढाब्यावर बसून मद्यपान करणं औरंगाबादच्या मद्यप्रेमींना चांगलेच महागात पडले आहे. कारण याप्रकरणी न्यायालयाने या मद्यप्रेमींना 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवसांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे मद्याची विक्री करणाऱ्या दोन हॉटेलमालकांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड व दहा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे मद्यपी व हॉटेल व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी ह्द्द्तील तिसगाव फाटा येथील हॉटेल पाटीलवाडा येथे हॉटेल चालक व मालक अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या बातमीनुसार 22 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद पथकाने याठिकाणी छापा घातला. यावेळी महादेव बाबासाहेब मुटकूले आणि दादासाहेब पांडुरंग मुटकूले दोन्ही (रा. हॉटेल पाटीलवाडा वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद) यांनी अवैधरित्या दारु बाळगून ठेवल्याचे पाहायला मिळाले. सोबतच हॉटेलमध्ये एकूण 17 ग्राहक दारु पितांना आढळून आल्याने, पथकाने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता.
करावासाची शिक्षा...
दरम्यान राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गुन्हयाच्या मुळ अहवाल (दोषारोपपत्र) व सर्व 19 आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हॉटेल चालक व मालक महादेव बाबासाहेब मुटकूले आणि दादासाहेब पांडुरंग मुटकूले यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 10 दिवसाचा कारवास अशी शिक्षा सुनावली. तसेच इतर मद्यसेवन करणाऱ्या 17 ग्राहकांना प्रत्येकी रुपये 500 दंड किंवा 2 दिवसाची करावसाची शिक्षा सुनावली. त्यामुळे सर्व आरोपींनी एकूण रुपये 58 हजार रुपयाचा दंड न्यायालयता भरना केलेला आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई हि राज्य उत्पादन शुल्कचे औरंगाबाद अधीक्षक संतोष झगडे, यांच्या नेतृत्वात भरारी पथकाचे औरंगाबाद निरीक्षक, विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक एस. बी. रोटे, ए. ई. तातळे, तसेच कर्मचारी सर्वेश्री युवराज गुंजाळ, रविंद्र मुरडकर, शारेक कादरी, सचिन पवार, संजय गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलिसांकडून विशेष पथकाची नियुक्ती...
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या कड्याला असणाऱ्या हातगाड्यांवर सहज दारू उपलब्ध होते. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. शहरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात दारू विरोधी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: पोलिसांची दुचाकी चोरांविरोधात मोठी कारवाई; गुन्ह्यातील 6 मोटारसायकल जप्त