मोठी बातमी! उद्यापासून औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक बेमुदत संपावर
Rickshaw Drivers Strike: घराबाहेर निघताना पर्यायी वाहतुकीची सोय प्रवाशांना करावी लागणार आहे.
Rickshaw Drivers Strike: आपल्या विविध मागण्यासाठी औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक संपावर जाणारा असून, उद्या 1 डिसेंबर पासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद रिक्षा चालक-मालक संघटनेने घेतला आहे. विशेष म्हणजे या संपात तब्बल 15 रिक्षा चालक संघटनांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे उद्या औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता असून, घराबाहेर निघताना पर्यायी वाहतुकीची सोय प्रवाशांना करावी लागणार आहे.
याबाबत औरंगाबाद रिक्षा चालक-मालक समितीतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वारंवार मागण्या करूनही प्रशासन रिक्षा चालकांकडे व रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरत आहे. तर रिक्षाचे इशुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्व वाहन चालक व मालकांना आधार मिळेल. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये शहरामधील पूर्ण ऑटो रिक्षा हे वाहन क्लेर ड्रेसकोड वर मिळतील आणि आज उपासमारीची वेळ आली, ती येणार नाही. तसेच यासह अनेक मागण्या पूर्ण होत नसल्याने औरंगाबाद रिक्षा चालक-मालक समितीतर्फे उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे.
'या' आहेत रिक्षाचालकांच्या मागण्या...
- रिक्षा चालवताना मीटर कॅलेब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी.
- रिक्षाचे इशुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळावी.
- ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांची मोहिम बंद करण्यात यावी.
- एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस स्टेशनमधील कर्मचारी रिक्षा चालकांना 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांचे गुन्हेगारीमध्ये परावृत्त करत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना गुन्हेगारीच्या कलमामुळे रिक्षा चालकांचे भविष्य धोक्यात आहे.
- रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नयेत.
- वाळूज एम. आय. डी. सी. ते सिडको, हडकोमध्ये प्रायव्हेट सेक्टर कंपनीच्या बस चालकांकडून अवैधरित्या वाहतुक करण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही.
- फक्त रिक्षा चालकांनाच दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात येत आहे.
'या' संघटनाचा पाठींबा...
- बहुजन हिताय रिक्षा चालक मालक संघटना
- शिव वाहतूक सेना
- वस्ताद वाहतुक दल
- रोशन ऑटो युनियन
- अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी रिक्षा चालक-मालक संघटना
- वाय. एफ. खान रिक्षा युनियन
- परिवर्तन अॅटो चालक-मालक संघटना
- महाराष्ट्र रिक्षा चालक सेना
- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना
- काँग्रेस रिक्षा युनियन
- मराठवाडा ऑटो रिक्षा युनियन
- पँथर पॉवर रिक्षाचालक-मालक संघटना
- महाराष्ट्र वाहतूक सेना
- मराठ मावळा संघटना
- रिपाई चालक-मालक संघटना