Aurangabad: दहीहंडीनिमित्ताने औरंगाबाद शहरातील 'हे' मार्ग राहणार बंद; पोलिसांनी सुचवले पर्यायी...
Aurangabad: दहीहंडीनिमित्ताने शहरातील काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
Dahi Handi 2022 : गोपाळकाला उत्सवाला आता काही तास शिल्लक असतांना औरंगाबादमध्ये दहीहंडी उत्सवाची (Dahi Handi 2022) जोरदार तयारी सुरु आहे. मात्र उद्याच्या गोपाळकाला उत्सव पाहता पोलिसांकडून शहरातील वाहतूक काही बदल करण्यात आले आहे. शहरातील कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक व शहरात इतर वेगवेगळया ठिकाणी लहान- मोठ्या दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात जनसमुदाय, विविध गोविंदाची पथके सहभागी होतात. दरम्यान या मार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत औरंगाबाद शहरातील खालील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंदी असेल.
- टी.व्ही. सेंटर, कॅनॉट प्लेस, गजानन महाराज मंदीर चौक.
- साक्षी मंगल कार्यालय ते टी.व्ही. सेंटर, हडको कॉर्नर ते टी.व्ही. सेंटर, शरद टी ते टी. व्ही. सेंटर, आय.पी.मेस ते टी.व्ही. सेंटर
- एचडीएफसी बँक एटीएम चौक ते कॅनॉट प्लेस, बॉम्बे स्टेशनरी ते कॅनॉट प्लेस, वाय झेड फोर्ड शो रूम ते कॅनॉट प्लेस, बाळासाहेब सानप यांचे कार्यालय ते कॅनॉट प्लेस, सिडको कार्यालया शेजारील रस्ता ते कॅनॉट प्लेस पर्यंत
- पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदीर चौक, जवाहरनगर पो.स्टे. समोर आदिनाथ चौक ते गजानन महाराज मंदीर चौक, त्रिमुर्ती चौक ते गजानन महाराज मंदीर चौक, सेव्हनहील उड्डाणपुल ते गजानन महाराज मंदीर.
- कोकणवाडी चौक व गुलमंडी.
- पंचवटी चौक ते कोकणवाडी चौक, विट्स हॉटेल वेंदातनगर ते कोकणवाडी चौक, एस.एस.सी. बोर्ड ते कोकणवाडी चौक, सेशन कोर्ट सिग्नल ते कोकणवाडी चौक.
- पैठणगेट ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी, बाराभाई ताजिया चौक ते गुलमंडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा पोलीस चौकी ते बाराभाई ताजिया.
यावेळी नागरिक खालील पर्यायी मार्ग वापरू शकतात
- टी.व्ही. सेंटर, कॅनॉट प्लेस, गजानन महाराज मंदीर चौक
- जिल्हाधिकारी कार्यालय कडून गणेश कॉलनीमार्गे टी. व्ही. सेंटर कडे येणारी जाणारी वाहतूक स्वर्ग हॉटेल एन 12 मार्गे जातील व येतील.
- हडको कॉर्नर कडुन टी.व्ही. सेंटरकडे येणारी वाहतूक एन 12 सिध्दार्थनगर अण्णाभाऊ साठे चौक येथून दिल्लीगेट कडे जातील व येतील.
- सेव्हनहील, एम.जी.एम., सेंट्रल नाकामार्गे टी. व्ही. सेंटरकडे येणारी वाहतूक आय.पी.मेस चौक येथून बळीराम हायस्कूल मार्गे जातील व येतील.
- शरद टी. पॉईट, जळगाव रोड कडुन टि.व्ही. सेंटर कडे येणारी वाहतूक जिजाऊ चौकातुन एम-2 रोडकडे जातील व येतील.
- पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदीर चौकाकडे येणारी वाहने हिंदू राष्ट्र चौक- विजयनगर - गजानन कॉलनी - रिलायंस मॉल मार्गे जातील व येतील.
- जवाहरनगर पो.स्टे. कडून गजानन महाराज मंदीर कडे येणारी वाहने माणिक हॉस्पीटल - डॉ.हेडगेवार रुग्णालयाचे पाठीमागील रोडने त्रिमुर्ती चौकाकडे जातील व येतील.
- त्रिमुर्ती चौकाकडून गजानन महाराज मंदीरकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे पाठीमागील रोड - माणिक हॉस्पीटल जवाहरनगर पो.स्टे. मार्गे जातील व येतील.
- सेव्हनहील उड्डाणपूल कडून गजानन महाराज मंदीरकडे येणारी वाहने जालना रोड मार्गे आकाशवाणीकडे जातील व येतील.
- कोकणवाडी चौक व गुलमंडी.
- पंचवटी चौक ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने रेल्वेस्टेशन मार्गे जातील व येतील.
- एस.एस.सी. बोर्ड ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने ही उस्मानपुरा तसेच चुन्नीलाल पेट्रोलपंप मार्गे जातील.
- विट्स हॉटेल वेंदातनगर ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने ही देवगिरी कॉलेज- आयटीआय- पिरबाजार उस्मानपुरा मार्गे जातील व येतील.
- शेषनकोर्ट सिग्नल ते कोकणवाडी चौकाकडे जाणारी वाहने महावीर चौक मार्गे जातील.
- पैठणगेट ते गुलमंडीकडे जाणारी वाहने ही बाबूराव काळे चौक- निराला बाजार मार्गे जातील व येतील.
- अंगुरीबाग कडुन येणारी वाहने गोमटेश मार्केट मार्गे जातील.
- सिटीचौक ते गुलमंडीकडे येणारी वाहने जुना बाजार पोस्ट ऑफीस मार्गे जातील.
- औरंगपुरा पोलीस चौकी ते गुलमंडीकडे येणारी वाहने नाथ सुपर मार्केट तसेच कुंभारवाडा मार्गे जातील.
तर या अधिसुचना पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.