![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pankaja Munde: भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून बनवला PM चहा
Aurangabad: विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले.
![Pankaja Munde: भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून बनवला PM चहा maharashtra News Aurangabad News Pankaja Munde stopped the fleet and made PM tea In Aurangabad Pankaja Munde: भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून बनवला PM चहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/235ad7a9fe2ae0c03b83721c863e5943166615855421989_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pankaja Munde Made Tea: पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे यावेळी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. कारण चहाची तलप लागल्याने पंकजा यांनी भर रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा (TEA) बनवला. विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले. तर यावेळी त्यांनी स्वतः बनवलेली चहा आपल्या सहकाऱ्यांना देखील पाजला. त्यामुळे सद्या पंकजा यांच्या PM चहाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद-बीड प्रवास करत असतानाच पंकजा मुंडे यांना चहाची तलप लागली. मग काय पंकजा यांनी बीड रोडवरील निपाणी फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलवर आपला ताफा थांबवला. पंकजा यांना चहा प्यायचा असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली. पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचे सांगत, थेट हॉटेलमधील किचन गाठलं. दिनेश यांच्याकडून दुध,चहा पती मागवून पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवलं. त्यानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत चहाचा आनंद घेतला.
आणि म्हणून चहा बनवला...
यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, मला चहा बनवून बरीच दिवस झाली आहे. मी स्वयंपाक उत्तम करते, मात्र चहा सहसा मी बनवत नाही. त्यामुळे आज खूप दिवसांनी मी चहा बनवला आहे. मी येथे मिसळ खाण्यासाठी आली होते. पण याठिकाणी आल्यावर गॅस आणि शेगडी पाहून मला चहा बनवण्याचा मोहच आवरला नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना चहा बनवून पाजण्याचं मी ठरवलं आणि त्यानुसार हा चहा बनवला असल्याचं पंकजा मुंडे 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाल्यात.
राजकीय टोलाबाजी....
तर याचवेळी चहावरून पंकजा मुंडे यांनी राजकीय टोलेबाजी सुद्धा केली. राजकारण आणि चहा याचं समीकरण आहे. राजकारण कसे असते, त्यामध्ये सर्वच गोष्टीचे मिश्रण असते. जसं चहामध्ये पत्ती,साखर व्यवस्थितपणे पडली पाहिजे, थोडसं इलायची वैगरे सर्व व्यवस्थित टाकल्यावर चहा चांगला बनतो. तर मला जरा स्ट्रॉंग चहा आवडतो असा खोचक टोलाही पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला. जे आपल्या वाट्याला येते त्याची चव तशी बदलून घ्यावी लागते. त्यामुळे ताटात काही कमी पडल्यास मी किरकिरी करत बसत नाही. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांना मी मटण, चिकन, बिर्याणी खाऊ घातला, चहाही बनवून दिला असल्याच्या आठवणी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या.
पंकजा मुंडे यांनी स्वतः बनवला चहा, पहा व्हिडिओ...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)