एक्स्प्लोर

Aurangabad News: नवीन उद्योजकांसाठी आता 'एक खिडकी' योजना; एकाच ठिकाणी अन् एकच महिन्यात मिळणार सर्व परवानग्या

Aurangabad News: राज्यात 'एक खिडकी' योजना राबवली जाणार असून, एकाच ठिकाणी अन् एकच महिन्यात नवीन उद्योजकांना परवानग्या मिळणार आहे. 

Aurangabad News: राज्यात येणारे उद्योग इतर राज्यात जात असल्याच्या आरोपावरून गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर नवीन उद्योजकांना (Entrepreneur) राज्यात आणण्यासाठी सरकार कमी पडल्याचा आरोप सद्याचे सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर करत आहे. एकीकडे हा वाद सुरु असतानाच आता नवीन उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रशासनाने मात्र जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. तर नवीन उद्योजकांसाठी आता राज्यात 'एक खिडकी' योजना राबवली जाणार असून, एकाच ठिकाणी अन् एकच महिन्यात नवीन उद्योजकांना परवानग्या मिळणार आहे. 

आज देशामध्ये जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यामध्ये निर्यात इनोव्हेशन, पायाभूत सुविधा, उद्योग, नोकऱ्या अशा सर्व गोष्टींबाबत महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे, त्याचे श्रेय उद्योजकांना जाते. त्यामुळे यामध्ये वाढ होण्यासाठी उद्योजकांशी संवाद वाढवून एक खिडकी योजनेची पद्धत निर्माण करण्यात येत असून, त्याचे लवकरच कायद्यामध्ये रूपांतर केले जाणार आहे. एक खिडकी योजनेतून नवीन उद्योजकांसाठी आणि उद्योगांसाठी लागणाच्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी आणि एक महिन्यात मिळणार असल्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले. औरंगाबाद येथे औरंगाबाद विभागाची औद्योगिक गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह बोलत होते. 

उद्योजकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या...

राज्य शासनाने प्रत्येक विभागात उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी तसेच त्याद्वारे बेरोजगारांना संधी मिळण्याच्या उद्देशाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून किचकट अटी आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करून जुन्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी उद्योजकांकडून सूचना मागवून त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी औरंगाबादमध्ये उद्योजकांच्या उपस्थितीत  औद्योगिक गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी, कालबाह्य नियमांमुळे रोजगारीवर होणारा परिणाम, गुंतवणूक वाढीसाठी आवश्यक सुविधा यांची माहिती दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जाणून घेतली.

धोरणांमध्ये बदल करण्याबाबत खुली चर्चा 

शासनाच्या वतीने नव्याने येणाऱ्या उद्योग धोरणावर संवाद व समन्वय साधण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येऊन यामध्ये अस्तित्वात असलेली धोरणे व काही धोरणांमध्ये बदल करण्याबाबत संवाद साधून खुली चर्चा करून त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. यातून स्थानिक गुंतवणूक वाढविण्याचा विचार करण्यात येणार असल्याचं देखील कुशवाह म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kidney Transplant: औरंगाबादमध्ये एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण; एचआयवी संक्रमित पत्नीने वाचवले पतीचे प्राण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget