एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही मुलं पळवणारी टोळी सक्रीय नाही, 'त्या' तीन घटनाही फक्त अफवाच

Aurangabad News: नागरिकांनी कायदा हातात घेऊ नयेत असे आवाहन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे. 

Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात मुले पळविणारी टोळी सक्रीय असून, त्यांची वाहने फिरत आहेत अशी अफवांचे मॅसेज सोशल मिडीयाचे माध्यमांतुन नागरिकांमध्ये पसरवले जात आहे. या अफवांमुळे अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा न करता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा संशय धरून जमावाकडून मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसांत औरंगाबादमध्ये अशाच तीन घटना समोर आल्या आहेत. याबाबत खुद्द पोलिसांनी पत्रकार परिषदेतून याची माहिती दिली आहे. 

पहिली घटना: 20 सप्टेंबर रोजी सिल्लोड ग्रामीण हद्दीतील पळशी या गावातील शाळकरी मुलाचे टोळीने अपहरण केल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली होती. यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जलद प्रतिसाद देत संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी करून संशयीत वाहनाची तपासणी वेगाने सुरू केली. तसेच शेजारील बुलठाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद शहर, अहमदनगर जिल्हा सिमा सुध्दा सर्तक ठेवत नाकबंदी करून वाहनतपासणी सुरू केली होती. दरम्यान पोलिसांच्या तपासात शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची घटना अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

दुसरी घटना: 21 सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे वडोदबाजार हद्दीतील आळंद येथे पांढऱ्या रंगाचे सुमो वाहन आले असुन, त्यामध्ये मुले पळविणारी टोळी असल्याची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे भितीची वातावरण निर्माण झाले. परंतु तात्काळ वडोदबाजार पोलीसांनी आळंद येथे जात संशयीत वाहनाचा शोध घेतला व ती अफवा निघाली.

तिसरी घटना: 28 सप्टेंबर रोजी जालना जिल्हयातील भोकरदन ते जालना रोडवर सखाराम जाधव यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील कारचालकाने धडक दिली व यामध्ये त्यांचा नातु दिपक झरे (वय 6 वर्ष) हा कारच्या बोनटवर आदळला.  कारचालकाने त्याला तसेच 8 किमी सिल्लोडच्या दिशेने नेले. यादरम्यान मुलाच्या ओरडण्याने नागरिकांना कारमध्ये मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यामुळे नागरिकांनी कारचा पाठलाग करून कार अडवुन 800 ते 1000 लोकांच्या जमावाने कारची तोडफोड सुरु केली. दरम्यान कारमधील पवन संजय बनकर (वय 35 रा. गोळेगाव ता. सिल्लोड) व इतर एक याला बेदम मारहाण केली. परंतु घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व त्यांचे पथकाने तात्काळ सिल्लोड शहर सिमेलगत मुठोळ फाटा येथे धाव घेतली. तसेच जमावाच्या तावडीतुन कार मधील जखमी पवन बनकर यांना शिताफिने बाहेर काढुन त्यांचा जिव वाचवला.

नागरिकांनी कायदा हातात घेऊ नयेत...

मुलं पळवणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलीसांच्या चौकशीमध्ये या फक्त अफवा असल्याचे निष्पन्न होत आहे. अशा अफवामध्ये नागरिक हे त्यांचे परिसरात आलेल्या अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा नकरता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा संशय धरून जमाव जमवुन मारहाण करतात. अनेकदा त्यांना बांधुन ठेवत, संशयीत वाहनाची तोडफोड करण्याच्या घटना मोठया प्रमाणावर घडत आहेत.त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नयेत असे आवाहन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे. 

पोलिसांचे आवाहन 

  • सोशल मिडीयावरिल कोणतीही माहिती नागरिकांनी स्वत: पडताळणी केल्या शिवाय पुढे फॉर्वर्ड करू नये. 
  • तुमच्या कडे आलेले मेसेज हे फॉर्वर्डेड असल्याचं पाहु शकता.
  • व्हिडीओ, ऍ़डिओ पाहुन त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. जो पर्यंत त्याची पडताळणी होत नाही किंवा पोलीस तुम्हाला सांगत नाहीत तो पर्यंत नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल आणि फॉर्वर्ड गोष्टीवर विश्वास ठेवु नये.
  • सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणा संदर्भात काहीही आलं आणि तुम्हाला संशयास्पद वाटल तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. 
  • शाळा, महाविद्यालय, गावात, किंवा गल्ली व परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन फिरतांना आढळुन आल्यास तात्काळ 112 क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.
  • जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपुर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळुन आल्यास त्याचे विरूध्द सक्त कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget