Marathwada: मराठवाड्यात सात महिन्यांत जवळपास 215 अनोळखी मृतदेह आढळले; ओळख पटेना
Marathwada: केंद्रीय स्तरावर आधार कार्डाची माहिती घेऊन या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा केला जातोय.
Marathwada Crime News: गेल्या काही दिवसात मराठवाड्यात अनोळखी मृतदेह आढळणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील सात महिन्यात तब्बल 215 अनोळखी मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक 81 अनोळखी मृतदेह औरंगाबाद जिल्ह्यात सापडले आहे. या मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. तर केंद्रीय स्तरावर आधार कार्डाची माहिती घेऊन या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा केला जात असल्याचे समोर आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मृतदेह आढळले...( 1 जानेवारी 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंतची आकडेवारी)
अ.क्र. | जिल्हा | मृतदेह संख्या |
1 | औरंगाबाद | 81 |
2 | जालना | 28 |
3 | परभणी | 18 |
4 | नांदेड | 36 |
5 | लातूर | 34 |
6 | बीड | 18 |
7 | उस्मानाबाद | 16 |
आधार विभागाची मदत...
एवढ्या मोठ्याप्रमाणावर असलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून आधार विभागासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. मृतदेहाच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे घेऊन आधारवरील माहितीवरून त्याची ओळख पटवली जाऊ शकते. मात्र सद्या पोलिसांना याबाबत परवानगी नसल्याने त्यासाठी संबधित विभागाची पत्रव्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे आधार विभागाकडून कितपत सहकार्य पोलिसांना मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
Crime: पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकून संपवणाऱ्या पित्याला न्यायालयाने सुनावली 'जन्मठेप'
Aurangabad Crime News: खर्चासाठी पेन्शनचे पैसे देत नसल्याने पुतण्यानेच चुलत्याला संपवलं