Sanjay Shirsat: उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन बाहेर पडतोय; शिरसाट यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं
Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन बाहेर पडतोय असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: निवडणुका आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय दिल्यावर, आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर घणाघात करत, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवश शिवधनुष्य चोरीला गेलं असल्याची टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या याच टीकेला आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन बाहेर पडतोय असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेर जी काही बयानबाजी केली आहे, ते खऱ्या अर्थाने त्यांना आलेलं फ्रस्ट्रेशन आहे. निवडणूक आयोगाने दिलेलं निकाल त्यांना जर मान्य नसेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. पण कोणाच्या हातात धनुष्यबाण होता त्यांचा चेहरा चोरा सारखा दिसत असल्याचं म्हणणं त्यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे एका उंचीचे नेते असून, त्यांनी पातळीवर जाऊ नयेत. एखाद्याने त्यांना जर उलटून बोलले तर त्याचा अर्थ वेगळा होईल, असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना कावीळ झाल्यासारखं पिवळ दिसत आहे...
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, जी काही कायदेशीर लढाई आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणी थांबवलेलं नाही. गाडणार कोणाला आणि राहणार कोण, याचा निर्णय जनता घेईल. त्यासाठी तुम्हाला किंवा मला सांगायची गरज नाही. जनता आपला मत बनवत असते. जर जनतेने आपल्या विरोधात मत बनवले असेल, तर त्याला आपल्याला दोष देता येणार नाही. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहेत, पण सुप्रीम कोर्टाने देखील तुमच्या विरोधात निकाल दिल्यास सुप्रीम कोर्टाने शेण खाल्ले असे म्हणून नका. अन्यथा जे लोकं उद्धव ठाकरे यांच्याकडे आदराने पाहतात तो आदर संपवून जाईल. जे काही झालं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नक्कीच फ्रस्ट्रेशन आले आहे. सर्व काही त्यांना कावीळ झाल्यासारखं पिवळ दिसत असल्याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नसल्याचं शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन!
शुक्रवारी आलेल्या निवडणुक आयोगाच्या निकालानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी खुल्या कारमधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकाही केली. तसेच आगामी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sandipan Bhumre: आता उद्धव ठाकरेंनीही 'शिवसेने'त यावं; संदीपान भुमरेंनी ठाकरे पिता-पुत्रांना डिवचलं