एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मराठी-कानडी वाद चिघळला असतानाच मराठमोळा डॉक्टर ठरला कानडी रुग्णासाठी देवदूत

Aurangabad: औरंगाबादच्या डॉक्टरांनी कानडी रुग्णावर तब्बल 27  दिवस उपचार करून बरे करत त्याला डिस्चार्ज दिला आहे.

Aurangabad News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस अधिकच पेटताना दिसत असून, कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात मराठी-कानडी वाद आता चांगलाच चिघळला आहे.  अशात दोन्ही राज्यांत सीमावाद पेटलेला असताना व दोन्ही राज्यांतील नागरिक एकमेकांकडे अविश्वासाने बघत असतान एका मराठी डॉक्टरने कानडी रुग्णावर माणुसकीच्या निरपेक्ष भावनेतून उपचार करून त्याला बरे करत सामाजिक सौहार्दाचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील ही घटना असून, या डॉक्टरांनी कानडी रुग्णावर तब्बल 27  दिवस उपचार करून बरे करत त्याला डिस्चार्ज दिला आहे. डॉ. बाळासाहेब शिंदे असे या डॉक्टराचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 3 नोव्हेंबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील प्रवेशद्वारासमोर सुमारे 70 वर्षीय निराधार कानडी वृद्ध थंडीत कुडकुडत असल्याचे डॉ. बाळासाहेब शिंदे यांना दिसले. मळकट कपडे, दाढी वाढलेली अशा स्थितीतील भटकत असल्याने वृद्धाची प्रकृती खालावली असल्याचे डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने व्हीलचेअर बोलावून रुग्णास उपचारासाठी नेले. उपासमारीमुळे त्याला चालताही येत नव्हते. अन् काही विचारल्यावर सांगताही येत नव्हते. डॉ. शिंदे यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याचे पाय हलत नसल्याने विविध तपासण्यात केल्या. तब्बल 27 दिवस उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली. 

कानडी भाषेमुळे अडचण झाली, पण...

कानडी असलेल्या या वृद्धास मराठी बोलता येत नव्हते. तो वेगळ्याच भाषेत बोलत होता. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. तो कानडी भाषेत बोलत असल्याचे तेजस्विनी तुपसागर यांच्या लक्षात आले. त्यांनी कानडी भाषा बोलता येणाऱ्या विजयश्री गडाख यांना बोलवून त्यांना बोलते केले. आपल्या भाषेत कोणीतरी बोलतंय हे पाहून त्यांना आनंद झाला. तीन वर्षापूर्वी मुलाने औरंगाबादेत आणले अन् रेल्वेस्टेशनवर सोडून निघून गेला. कर्नाटक राज्यातील बाचाडी, बसवकल्याण येथील रहिवासी असून राजू रामगौडा नाव असल्याचे त्याने सांगितले. पैसे कमावून आणत नसल्याने मुलाने मला इथे आणून सोडले. पत्नी, मुलगा, सून, मुलगी असल्याचे रामगौडा यांनी सांगितले. घरच्यांची आठवण तर येते मात्र, पोराने असे केल्याने घरी कसे जावे असा उलटप्रश्न करत रामगौडा यांनी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले.

रक्ताची नाती दुरावत आहे....

रामगौडा यांची कहाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतर रुग्णांना समजल्यानंतर सर्वांनीच त्यांची काळजी घेण्यास सुरूवात केली. या काळात सुमित दाभाडे, रवी मगरे, नितीन रनभरे, साहेबराव केळोदे, तेजस्विनी तुपसागर, आयान बेग यांनी सदर वृद्धची काळजी घेतली. या काळात उपचार घेणारे इतर रुग्णही रामगौडा यांचे मित्र झाले होते. रामगौडा यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना कुठे पाठवावे हा प्रश्न सर्वांना पडला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेचा शोध घेऊन रामगौडा यांना बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारा गृहात नेण्यात आले. साहेबराव केळोदे यांनी जीवनावश्यक वस्तूंची भेट त्यांना दिली. जीवंतपणी मरणयातना सोसणाऱ्या वृद्धाला माणुसकीने तारल्याची प्रचिती यानिमित्ताने आली. दरम्यान, त्यांना वाटेल तोपर्यंत निवारागृहात ठेवणार असल्याचे प्रशांत दंदे, इक्बाल पठाण यांनी सांगितले. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत असले तरीही मात्र रक्ताची नाती दुरावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

सीमावर्ती भागातील जत तालुक्यामधील गावे पाणी प्रश्नावरुन आक्रमक, कर्नाटकात जाण्याचा महाराष्ट्र सरकारला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊतRajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Embed widget