IT Raid: औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरूच, 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचे पथक
Income Tax Raids: कालपासून सलग कारवाई सुरु असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Income Tax Raids: औरंगाबाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याचे समोर आले आहे. बुधवारी औरंगाबाद शहरातील ज्योतिनगर भागात राहणाऱ्या व्यास नावाच्या धान्य व्यापाऱ्यांवर, ही छापेमारी करण्यात आली होती. मात्र आज दुसऱ्या दिवशी सुद्धा ही कारवाई सुरूच आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी आलेल्या पथकात अंदाजे 50 कर्मचारी आणि अधिकारी असल्याचे समोर आले आहे. कालपासून सलग कारवाई सुरु असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील उद्योजक सतीश व्यास यांचे राजस्थानमध्ये शासकीय योजनेसाठी धान्य पुरवण्याचं कंत्राट असल्याची माहिती समोर येत आहे. यातूनच ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीने देखील या छापेमारीकडे पाहिले जात आहे. तर काही दिवसांपूर्वी जालना येथील स्टील उद्योजकांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत सुद्धा औरंगाबाद कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
एकाचवेळी 110 ठिकाणी छापेमारी...
औरंगाबादसह देशातील अनेक ठिकाणी एकाचवेळी आयकर विभागाने 110 ठिकाणी ही छापेमारी केली आहे. ज्यात महाराष्ट्र,गुजरात,दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांचा समावेश आहे. तर यातील अनेकांचे राजकीय संबध असल्याचे सुद्धा बोलण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये उद्योजक सतीश व्यास यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Income Tax Raids: आयकर विभागाची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह देशातील 50 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
Jalna IT Raid: जालना म्हणजेच 'सोने का पालना'..., गेल्यावर्षीही 32 ठिकाणी पडले होते छापे