मोठी बातमी: नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग; गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
Jayakwadi Dam: नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.
Aurangabad News: वरील धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी जायकवाडी धरणातून एकूण 47 हजार 760 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धरणाजवळील पैठण-शेवगावला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. तर गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आज सकाळी (बुधवारी) सहा वाजल्यापासून 3000 क्यूसेकने विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे 95 टक्के भरलेल्या जायकवाडीमधून सुद्धा आता मोठा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सद्या जायकवाडीत एकूण 36 हजार 425 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु असून, एकूण 47 हजार 760 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सद्याची परिस्थिती...
पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.13 फुट
जिवंत पाणी साठा (Live) : 2067.047 दलघमी (72.99 टिएमसी)
एकुण पाणी साठा (Gross) : 2805.153 दलघमी (99.05टिएमसी)
पाण्याची आवक (Inflow): 36425 क्युसेक्स
पाण्याचा विसर्ग (Discharge) : सांडव्याद्वारे 47160 क्युसेक्स, उजव्या कालव्यातून 600 क्युसेक्स
एकुण विसर्ग: 47760 क्युसेक्स
अठरा दरवाजे उघडले...
जायकवाडी धरणाचे सद्या 27 पैकी 18 दरवाजे उघडण्यात आले आहे. 10 ते 17 असे अठरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उघडण्यात आलेले दरवाजे अडीच फुट उंच करून उघडले असून, त्यातून 47160 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. वरील पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवला जाण्याची शक्यता आहे.
नदी काठच्या शेती पाण्याखाली...
यावर्षी जुलै महिन्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागले असल्याने गोदाकाठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण अनेकजण नदी काठच्या शेतात शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र धरणातून सतत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने यावर्षी या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात आणखी पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांनायंदा मोठ फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला! गंगापूर धरणातून 3 हजार क्यूसेकने विसर्ग
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, भंडारा गोंदियात पूरस्थिती