एक्स्प्लोर

Aurangabad: मिनी बँकेतील साडेचार लाख रुपये चोरटय़ांनी लांबवले; पुरावा मिटवण्यासाठी चक्क...

Aurangabad News: या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील तीसगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मिनी शाखेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करत तब्बल साडेचार लाख रुपये लांबवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, आपली ओळख पटू नयेत म्हणून चोरट्यांनी मिनी बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर सुद्धा काढून सोबत नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गल्लेबोरगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मुख्य शाखा आहे. या मुख्य शाखेची मिनी शाखा खुलताबाद तालुक्यातील तीसगाव येथे आहे. तर ही मिनी शाखा तिसगाव येथील संजय जगताप आपल्या स्वतःच्या जागेत चालवतात. नेहमीप्रमाणे बँकेचे कामकाज आटपून जगताप यांनी बँक बंद केली. त्यांनतर जेवण झाल्यानतर ते झोपी गेले. 

जगताप कुटुंबातील सदस्य झोपेत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मिनी बँक, ग्राहक सेवा केंद्राचे शेटर उघडून आत प्रवेश केला. त्यांनतर एका टेबलाच्या ड्रापमध्ये ठेवलेले 4 लाख 50  हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी जगताप यांच्या घराच्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून घेतली. रात्री दोन वाजेच्या सुमारास जगताप यांना जाग आली असता, बँकेत चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलीस घटनास्थळी... 

तीसगाव येथील मिनी बॅंकेत चोरी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद अघाव, खुलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनतर घटनास्थळचा पंचनामा करत जगताप यांच्या जबाबावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

ओळख लपवण्यासाठी डिव्हीआर सोबत नेला...

मिनी बँक असल्याने जगताप यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही बसवले होते. तर बँकमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आपली ओळख पटण्याची भीती असल्याने चोरट्यांनी बँकमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून सोबत नेला आहे. त्यामुळे चोरट्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून या चोरट्यांच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget