Aurangabad: उसने घेतलेल्या पैश्यांच्या बदल्यात महिलेवर बळजबरीने अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल
Aurangabad News: दोन वर्षांपूर्वी या महिलेने आपल्या ओळखीच्या शेख तन्वीर याच्याकडून 50 हजार रुपये हातउसने घेतले होते.
Aurangabad Crime News: एका महिलेला दिलेल्या उसने पैश्यांच्या बदल्यात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या वाळूज परिसरात समोर आली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या या आरोपीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर तस्लीम शेख (वय 32 वर्षे, रा. जोगेश्वरी) असे आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात राहणाच्या 29 वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्याने ती गेल्या आठ-नऊ वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होती. तसेच वाळूज येथील एका कंपनीत काम करून ती आपला उदरनिर्वाह करत असे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी या महिलेने आपल्या ओळखीच्या शेख तन्वीर याच्याकडून 50 हजार रुपये हातउसने घेतले होते.
महिलेवर बळजबरीने केला अत्याचार...
शेख तन्वीर याच्याकडून घेतलेले पैसे महिला थोडे-थोडे करून परत देत होती. पैश्याच्या देणघेण असल्याने तन्वीर महिलेच्या घरी नेहमी यायचा. दरम्यान एक दिवस महिला एकटी राहत असल्याचे पाहून तन्वीर याने तिच्यासोबत लगट करून 'तुझ्याकडील उसने पैसे तू मला परत देऊ नकोस, तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत राहा.' असे म्हणून तन्वीर याने एके दिवशी तिच्या घरात महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला बदनामीची धमकी देत तन्वीर याने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला.
महिलेची पोलिसात धाव..
गेल्या दोन वर्षांपासून तन्वीर महिलेवर बदनामीची धमकी देऊन अत्याचार करत होता. दरम्यान 15 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास तन्वीर याने महिलेला दिलेल्या हात उसन्या पैशांवरून वाद घालून महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने यावेळी त्यास विरोध केला असता तन्वीर याने महिलेस मारहाण करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर महिलने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात शेख तन्वीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी आरोपी तन्वीर यास अटक करून न्यायालयामोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या...
'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाने स्वतःला संपवलं; फेसबुकच्या माध्यमातून झाली होती ओळख