'हो एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचेय',पण...; संदिपान भुमरे स्पष्टचं बोलले
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटातील आमदार संदिपान भुमरे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख होण्याचा अजिबात मोह नाही. परंतु, त्यांना पक्षाचे प्रमुख व्हायचे आहे, असं भुमरे म्हणाले आहे.
शिंदे गटाने बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक पदाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्याही देण्यात आल्या आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आह. तर यांची भूक एवढी वाढली आहे की, मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता त्यांना शिवसेनाप्रमुख व्यायच आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. यावर बोलतांना भुमरे म्हणाले की, बाळासाहेब हे फक्त ठाकरे कुटुंबीयांचेच नाही. तर ते सर्वच शिवसैनिकांसाठी वडिलां’समान होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख होण्याचा अजिबात मोह नाही. परंतु, त्यांना पक्षाचे प्रमुख व्हायचे आहे, असे भुमरे म्हणाले आहे.
एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा...
गेल्या आठवड्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौरा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील काही विकासकामांचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर शहरात त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. तर याच दौऱ्यातून बंडखोर आमदारांकडून शक्तिप्रदर्शन केली जाण्याच्या शक्यता आहे. तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे.