कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल
Ajit Pawar On Abdul Sattar : सिल्लोड येथील कृषी महोत्सवारून अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
Ajit Pawar On Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) अधिवेशनादरम्यान आक्रमक होताना पाहायला मिळाले. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करुन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या 'सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी 25 हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे माझाकडे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर...
अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिल्लोडबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच या संदर्भात कुठेही असे चालले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
सत्तारांची हकालपट्टी करा, महाविकास आघाडी आक्रमक
राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को, 50 खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके, वसुली सरकार हाय हाय, श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या. अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली. तर अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
VIDEO : Ajit Pawar on Abdul Sattar : निर्लज्जपणा कशासाठी? माझ्याकडे पुरावे आहेत, सत्तारांचा राजीनामा घ्या