Aurangabad: राज्यात साडे सात हजार पोलिसांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Aurangabad: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याची बंडखोर आमदारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
LIVE
Background
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 व 31 जुलै 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या याच दौऱ्यातून बंडखोर आमदारांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. आपल्या याच दौऱ्यात बंडखोर आमदार रमेश बोरनारे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री राजकीय सभा सुद्धा घेणार आहेत. तर आमदार संदिपान भुमरे,संजय शिरसाट आणि भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाला भेटी देणार आहे.सोबतच मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीतून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सुद्धा घेणार आहे.
राज्यात साडे सात हजार पोलिसांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्रात साडे सात हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय?: एकनाथ शिंदे
Aurangabad News: औरंगाबाद येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असून, भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय? असे ते म्हणाले. तर माझ्यावर विश्वास ठेऊन आलेल्यामधील एकजणही म्हणाला नाही की, मी ईडीच्या धाकामुळे आलोय. आमच्या मर्जीने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ईडीच्या धाकाने, कोणत्याही तपास यंत्रणाच्या धाकानं कुणी येत असेल तर मला नकोय,असे शिंदे म्हणाले.
Aurangabad: अर्जुन खोतकरांचा अखेर शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या अधिकृतरीत्या शिंदे गटात प्रवेश करण्यात आला आहे. सिल्लोड येथे आयोजित जाहीर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे, रामदास कदम, यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.
राज्यातील सर्व मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा : अब्दुल सत्तार
राज्यातील सर्व मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. मी मुस्लिम असून देखील एकनाथ शिंदेंसोबत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असल्यामुळे माझ्यात आणि अर्जुन खोतर यांच्यात वाद होणार नाही, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथील सभास्थळी दाखल
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून ते सिल्लोड येथे पोहचले आहे. सिल्लोड येथे मुख्यमंत्री यांची सभा होणार असून, ते सभास्थळी दाखल झाले आहे. त्यामुळे या सभेतून मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.