खोके,वाईन शॉप असल्याने संदिपान भुमरे मस्ती आल्यासारखे वागतायत: खैरेंची खोचक टीका
Aurangabad News: भुमरे यांना तिकीटपासून तर निवडून आणण्यापर्यंत मी खूप मदत केली, मात्र आज ते पलटले आहे: चंद्रकांत खैरे
Chandrakant Khaire Vs Sandipan Bhumre: औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार असतांना चंद्रकांत खैरे यांनी फक्त देवपूजा करण्यात वेळ घालत, औरंगाबादचं वाटूळ केल्याची टीका रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. भुमरे यांच्याकडे आता खूप काही खोके आहेत, वाईन शॉप आहेत, हजार एकर शेती आहे. त्यामुळे आज ते मस्तीत आल्यासारखं वागतायत, अशी खोचक टीका खैरे यांनी केली आहे.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, संदिपान भुमरे बोका आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांना बोका नावं दिलं आहे. त्यामुळे त्या बोक्याला काय सांगायचं. भुमरे यांना काही बोलता येत नाही, गावठी भाषामध्ये आता ते औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कारभार पाहणार आहे. तीस वर्षांपूर्वी मी पालकमंत्री असतांना भुमरे माझ्या पाठीमागे फिरायचे. पण मी त्यांना सन्मान द्यायचो, मान द्यायचो की, माझा आमदार आहे. त्यावेळी मी त्यांना खंबीर केलं आणि तेथून ते मोठे झाले. भुमरे यांना तिकीटपासून तर निवडून आणण्यापर्यंत मी खूप मदत केली. मात्र आज ते पलटले आहे. आज त्यांच्याकडे खूप काही खोके आहेत, वाईन शॉप आहेत. हजार एकर शेती असून, ते मस्तीत आल्यासारखं वागतायत, असे खैरे म्हणाले
दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक निस्वार्थपणे येणार...
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 25 हजार नागरिकांना औरंगाबादमधून नेणार असल्याच्या प्रश्नावर बोलतांना खैरे म्हणाले की, आम्ही कधीच आकडा सांगणार नाही. अनेकजण आपापल्या सोयीनुसार दसरा मेळाव्यासाठी जात असतात. कुणाला पैसे देण्याची गरज नसून, शिवसेना काही खोकेवाली नाही.त्यामुळे सर्वजण आपापल्या पैश्याने आणि आपल्या भाकरी सोबत घेऊन दसरा मेळाव्यात येत असतात. शिवसेनेची दसरा मेळाव्याची जुनी परंपरा असून, शिवसैनिक कोणतेही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे शिवाजीपार्कवर येत असतो, असे खैरे म्हणाले.
एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते...
एबीपी माझासोबत बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी आणखीन खळबळजनक दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. तसेच आपल्याला काँग्रेसमध्ये घ्यावे यासाठी एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांचे मागे लागले होते. मात्र मातोश्रीवर याची कुणकुण लागल्याने डाव फसला असा दावा खैरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Sandipan Bhumre: 'फक्त मैदानात या दाखवतो', पालकमंत्री होताच भुमरेंचा खैरे-दानवेंवर हल्लाबोल