मोठी बातमी! औरंगाबादमध्ये जुगार अड्यावर पोलिसांची कारवाई, पाच लक्झरी कारसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त
Aurangabad News: व्हीआयपी जुगार अड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर औरंगाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत एका व्हीआयपी जुगार अड्यावर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील मोठ्या प्रतिष्ठीताना जुगार खेळताना पकडले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर या कारवाई तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका खाजगी फार्म हाऊसवर हा जुगार अड्डा सुरु होता. ज्यात 25 लाख रोख रक्कम व 5 चार चाकी लक्झरी गाड्यासह एकूण 1 कोटी 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना गोपनीय बातमीदारामार्फत शिल्लेगाव हद्दीतील दगडा फार्म हाऊस येथे अवैधरित्या जुगार अड्डा चालु असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना त्यांच्या पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्याचे सुचना देऊन रवाना केले. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकांने कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणाऱ्या रोडवर मनोजकुमार दगडा यांच्या फार्म हाऊसवर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास छापा मारला. छापा टाकल्यावर पोलिसांनी चौकशी केली असता सात-आठ लोकं पत्यावर पैसे लावुन झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली.
प्रतिष्ठीताना जुगार खेळताना पकडले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे. तर काही बिल्डर आणि इतर प्रतिष्ठीत लोकांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. यावेळी घटनास्थळी पाच महागड्या लक्झरी कार सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे एका खाजगी फार्म हाऊसवर हा जुगार अड्डा सुरु होता. त्यामुळे व्हीआयपी जुगार अड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर औरंगाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यांना घेतलं ताब्यात...
- पुनमसिंग सुनील ठाकुर (वय 33 वर्ष रा. रांजणगाव शेणपूजी, ता.जि. औरंगाबाद)
- गणेश रावसाहेब पोटे (वय 28 वर्ष रा.नागेश्वरवाडी, औरंगाबाद)
- कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल (वय 37 वर्ष रा. शहागंज, औरंगाबाद)
- अभिषेक वसंतकुमार गांधी (वय 36 वर्ष रा.चिकलठाणा औरंगाबाद)
- संदीप सुधीर लिंगायत (वय 47 वर्ष रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद)
- विशाल सुरेश परदेशी (वय 33 वर्ष रा पदमपुरा, औरंगाबाद)
- मनोजकुमार फुलचंद दगडा (वय 46 वर्ष रा. सिडको एन-9 छायानगर, औरंगाबाद)
महत्वाच्या बातम्या....
Aurangabad: गावातील चौकाला औरंगजेबाचे नाव दिल्याने वाद, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन
Aurangabad: जिथे सोळा लोकांना चिरडले तिथेच आता सुसाट चेन्नई एक्स्प्रेसने 43 मेंढ्यांना उडवले